केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कांद्याच्या किमतीवर थेट परिणाम करणारा मोठा निर्णय घेतला आहे.  मागील तीन महिन्यांपासून कांदे निर्यातीवर लावलेले प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. १ जानेवारी २०२१ पासून हा निर्णय देशभरात अमलात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारनं सप्टेंबर २०२० मध्ये कांद्याच्या निर्यातीवर प्रतिबंध आणला होता. देशात कांदा उपलब्ध व्हावा आणि… Continue reading केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय…

विरोधकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये : शौमिका महाडिक

टोप (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेले शेती विधेयक हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नक्कीच हिताचे आहे. विरोधकांनी राजकीय हेतू ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असे मत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले. पुलाची शिरोली येथील बाप्पा फाउंडेशनतर्फे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन थेट शेतकरी संवाद व शेतीविषयक… Continue reading विरोधकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये : शौमिका महाडिक

कृषि कायद्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट : नामदेवराव  गावडे  

सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या नव्या कृषि कायद्यामुळे देशातील शेतीव्यवसाय कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव शेतकऱ्यांनी उधळून लावावा. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे महासचिव नामदेवराव गावडे यांनी केले. ते करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे शेतकरी संघर्ष समन्वयक समितीतर्फ आयोजित शेतकरी सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी  रघुनाथ वरुटे होते. गावडे म्हणाले की, राज्यसभेत बहुमत नसतांना मोदी सरकार तीन नवे… Continue reading कृषि कायद्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट : नामदेवराव  गावडे  

नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला  लागणार : सत्यजीत पाटील

सावरवाडी (प्रतिनिधी) :  केंद्र शासनाने नव्याने केलेल्या कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी चळवळ उभी केली पाहीजे. नव्या कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार असल्याची टीका कॉग्रेसचे नेते आणि गोकूळ दुध संघाचे संचालक सत्यजीत पाटील यांनी केली. ते कसबा बीड येथे शेतकरी संघर्ष जनजागरणच्या सभेत बोलत होते.  यावेळी महाराष्ट्र… Continue reading नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला  लागणार : सत्यजीत पाटील

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २ हजार रुपये…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ डिसेंबर रोजी वर्षातील तिसरा २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. ते आज (शुक्रवार) मध्य प्रदेशमधील किसान महासंमेलनात बोलत होते. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.… Continue reading शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २ हजार रुपये…

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे : नामदेव गावडे

सावरवाडी (प्रतिनिधी) :  राज्यसभेत बहुमत नसताना  मुठभर बहुराष्ट्रीय कंपन्याच्या हितासाठी भाजपाने नवीन कृषी कायदे मंजूर केले. हे कायदे देशातील शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे असल्याची  टिका  महाराष्ट्र राज्य किसान सभेचे महासचिव नामदेवराव गावडे यांनी केली. ते करवीर तालुक्यातील हसुर दुमाला येथे किसान संघर्ष यात्रेच्या सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तुकाराम पाटील होते.  गावडे म्हणाले की, केंद्र शासनाने… Continue reading नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे : नामदेव गावडे

सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोन आठवड्याहून अधिक काळ दिल्ली येथील सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी धक्कादायक घटना घडली. एका शेतकऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. पानिपतच्या पार्क रुग्णालयामध्ये शेतकऱ्याचा मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी सोनिपत पोलीस तपास करत असून संबधित शेतकरी हा कर्नालमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. अद्याप त्या शेतकऱ्याचे नाव… Continue reading सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

मोदी सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स अफेअर्सने साखर कारखान्यांना निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी केंद्राने ३५०० कोटी रुपये साखर निर्यात अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या… Continue reading मोदी सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

सुप्रीम कोर्टाची शेतकरी संघटनांना  नोटीस..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीचे रस्ते रोखून धरलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव हटविण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज (बुधवार) सुनावणी झाली. शेतकरी संघटनांना सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली असून उद्यापर्यंत रस्ता रोखणाऱ्या शेतकऱ्यांची नावे देण्यास… Continue reading सुप्रीम कोर्टाची शेतकरी संघटनांना  नोटीस..

शेतकरी आंदोलनाचे पडसाद बाजार समितीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये देखील उमटत आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे बाजार समितीतील व्यवहारावर त्याचा परिणाम झाला. कांदा उलाढाल व्यवहार बंद राहिली. त्यामुळे दिवसभर बाजार समितीच्या आवारात वर्दळ… Continue reading शेतकरी आंदोलनाचे पडसाद बाजार समितीत

error: Content is protected !!