अखेर किसान मोर्चाचे आंदोलन स्थगित…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  कृषी कायदे मागे घ्यावेत तसेच इतर मागण्यांसाठी दिल्लीसह सिंघू सीमेवर गेल्या ३८० दिवसांपासून संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन सुरू होते. केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही हे आंदोलन सुरूच होतं. हे आंदोलन आता स्थगित केल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने पत्रकार परिषदेत केली आहे. या आंदोलनामध्ये शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदा करावा, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे… Continue reading अखेर किसान मोर्चाचे आंदोलन स्थगित…

…तर अधिकाऱ्यांच्या गाड्या फिरू देणार नाही : राजू शेट्टी

कुरूंदवाड (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरणार असून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केल्यास अधिकाऱ्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ते आंबा (ता. शाहूवाडी) येथील अभ्यास शिबिरामध्ये बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी इंद्रजीत… Continue reading …तर अधिकाऱ्यांच्या गाड्या फिरू देणार नाही : राजू शेट्टी

रघुनाथदादा शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची शनिवारी महत्त्वाची बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि हुतात्मा बाबू गेणू यांच्या स्मृतिदिनानिमित्त रघुनाथदादा शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक निर्मला सांस्कृतिक भवन येथे ११ व १२ डिसेंबररोजी होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज (बुधवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली. केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी… Continue reading रघुनाथदादा शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची शनिवारी महत्त्वाची बैठक

मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड, फळबाग लागवड कार्यक्रमाला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यास राज्य सरकारच्या नियोजन विभागाने ( रोहयो) मंजूरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. यावर्षी अतिवृष्टी, कलमी रोपांची अनुपलब्धता, शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचे प्रस्ताव ऑनलाईन करण्यास झालेला विलंब, ऑनलाईन करणं प्रलंबित… Continue reading मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ…

संताजी घोरपडे कारखान्याची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक ते १५ नोव्हेंबरची एकरकमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच, कारखान्याने २० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील तोडणी- वाहतूक बिलेही खात्यावर जमा केली आहेत. या पत्रकात म्हटले आहे की, सरसेनापती संताजी… Continue reading संताजी घोरपडे कारखान्याची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा   

अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिग्राहकांनी ११ लाख भरले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या इचलकरंजी विभागातील अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिपंप ग्राहक कृषी धोरणात सहभाग नोंदवून ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीज बिल भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. महावितरणकडून कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांचे हस्ते थकबाकीमुक्त ग्राहकांचा सन्मान करण्यात आला. कृषी धोरण हे कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुक्त करणारे धोरण आहे. या धोरणात सहभागाची मुदत मार्च… Continue reading अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिग्राहकांनी ११ लाख भरले

पूरबाधित ऊस लवकर तोडण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी  

रांगोळी (प्रतिनिधी) : महापुरामुळे नुकसान झालेल्या उसाची लवकर तोडणी  करण्यात यावी. चालू वर्षी गाळप होणाऱ्या उसाला ३३०० रूपये दर द्यावा,  अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (बुधवार) करण्यात आली. याबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, मॅनेजर मनोहर जोशी  यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार… Continue reading पूरबाधित ऊस लवकर तोडण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी  

जिल्ह्यात कृषी विभागातर्फे शेतकरी मासिक वाचन सप्ताह सुरू : भीमाशंकर पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मासिक वाचन सप्ताह सुरू करण्यात आला आहे. तरी याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेवून शेतकरी मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी केले. भीमाशंकर पाटील म्हणाले की, कृषी विभागामार्फत १९६५ पासून शेतकरी मासिक शेतकऱ्यांच्या सेवार्थ… Continue reading जिल्ह्यात कृषी विभागातर्फे शेतकरी मासिक वाचन सप्ताह सुरू : भीमाशंकर पाटील

सेद्रिंय शेतीचा शेतकऱ्यांना फायदा : खा. धैर्यशील माने

टोप (प्रतिनिधी) : मातीचा पोत व्यवस्थित निर्माण झाला तर शेतकरी काहीही करु शकतो. आर्थिक स्त्रोतासाठी यंत्रणांची जोड घेवून सेद्रिंय शेतीला बळ दिल्यास चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. असे मत खा. धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. ते टोप येथे बायोकेअर कृषी मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनावेळी बोलत होते. खा. माने म्हणाले की, शेतकरी नसलेले काही लोक माती सुध्दा… Continue reading सेद्रिंय शेतीचा शेतकऱ्यांना फायदा : खा. धैर्यशील माने

विजेअभावी धामणी खोऱ्यातील पिके वाळू लागली : महावितरण लक्ष देणार का ?

कळे (प्रतिनिधी) :  जुलै महिन्यात झालेल्या महापुरामुळे धामणी नदीकाठावरील शेकडो एकर पिकांना मोठा फटका बसला आहे.  भात आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच महापुरामुळे शेती पंपाला वीज पुरवठा करणारे वीज खांब पडल्याने सध्या शेती पंपाचा वीज पुरवठा बंद आहे. पण सध्या वीज नसल्याने शेतीसाठी पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी उरलासुरला पूरबाधित ऊस व… Continue reading विजेअभावी धामणी खोऱ्यातील पिके वाळू लागली : महावितरण लक्ष देणार का ?

error: Content is protected !!