मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर

वर्धा (वृत्तसंस्था) : येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची आज निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. विदर्भ साहित्य संघाचे यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे मराठी साहित्य संमेलन विदर्भात व्हावे अशी मागणी होत होती. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान विदर्भ… Continue reading मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर

अंतराळातून आलेल्या १८६३ सिग्नल्समुळे एलियन्सच्या वास्तव्याची चर्चा

चंद्रपूर : पृथ्वी वगळता काही ग्रहांवर जीव असू शकतात, याचा शोध शास्त्रज्ञ मागील अनेक वर्षांपासून घेत आहेत. यात त्यांना अद्याप यश आले नाही. अशात शास्त्रज्ञांना अंतराळाच्या एका कोपऱ्यातून अवघ्या ८२ तासांत जवळपास १८६३ सिग्नल्स मिळाले आहेत. यामुळे एलियन्स असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खरंच एलियन असतील आणि ते पृथ्वीवर आक्रमण करतील तर काय होणार? यावर… Continue reading अंतराळातून आलेल्या १८६३ सिग्नल्समुळे एलियन्सच्या वास्तव्याची चर्चा

ओएनजीसी, टाटा मोटर्स, महिंद्रापेक्षा अधिक तिरुपतीची संपत्ती

तिरुमला : येथील व्यंकटेश्वर मंदिराची संपत्ती २.५ लाख कोटी असून, ही संपत्ती विप्रो, नेस्ले, ओएनजीसी, इंडियन ऑईल यांच्या बाजारमूल्यापेक्षा अधिक आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टची १९३३ मध्ये स्थापना झाल्यापासून प्रथमच देवस्थानाची संपत्ती घोषित केली गेली आहे. या देवस्थानाचे मूल्य ५३०० कोटींचे असून, १०.३ टन सोने आणि राष्ट्रीयीकृत बँकेत १५९३८ कोटींच्या ठेवी त्यात सामील आहेत. जून… Continue reading ओएनजीसी, टाटा मोटर्स, महिंद्रापेक्षा अधिक तिरुपतीची संपत्ती

महाराष्ट्रात १८ दिवस भारत जोडो यात्रा

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. ही यात्रा महाराष्ट्रात एकूण १८ दिवस चालणार आहे. २० नोव्हेंबरअखेर राहुल गांधी पाच जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढणार आहेत. राहुल गांधी यांचा ११ नोव्हेंबरपर्यंत नांदेड जिल्ह्यात मुक्काम राहणार आहे. त्यानंतर ते ११ ते १५ नोव्हेंबरपर्यंत वाशिम… Continue reading महाराष्ट्रात १८ दिवस भारत जोडो यात्रा

राज्यातील शिंदे सरकार लवकरच कोसळणार : आदित्य ठाकरे

अकोला (वृत्तसंस्था) : गद्दारांनी घटनाबाह्य सरकार स्थापन करून शिवसेनेसह महाराष्ट्रातील जनतेला मोठा धोका दिला. येत्या काही महिन्यात गद्दारांचे घटनाबाह्य सरकार कोसळणार, अशा शब्दात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत सरकारकडून मिळालेली नाही. राज्यभरातील या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना युवासेना… Continue reading राज्यातील शिंदे सरकार लवकरच कोसळणार : आदित्य ठाकरे

मंत्री सत्तार यांची खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषा

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. सिल्लोड या आपल्या मतदारसंघात एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषा वापरली. त्यानंतर एकच खळबळ उडाली असून, सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे… Continue reading मंत्री सत्तार यांची खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषा

सोयाबीनचे दर लवकरच वाढणार

औरंगाबाद (प्रतिनिधी) : फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनला ७ हजार रुपये भाव होता; मात्र नंतर भाव कमी झाले. यंदा परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पिकाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा असतानाच सोयाबीनचे भाव आज औरंगाबाद बाजार समितीमध्ये ५ हजार रुपयांवरून ५ हजार ३०० रुपये झाले आहेत. नवीन सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे… Continue reading सोयाबीनचे दर लवकरच वाढणार

सूर्यग्रहण बघितले आता पाहा चंद्रग्रहण

चंद्रपूर (प्रतिनिधी) : नुकतेच २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून ८ नोव्हेंबरला पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशाच्या पूर्वाेत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि ३ तास ग्रहण पाहावयास मिळेल, तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल, अशी माहिती अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. महाराष्ट्रात गडचिरोली… Continue reading सूर्यग्रहण बघितले आता पाहा चंद्रग्रहण

पहिल्यांदाच दोन्ही गटांच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आज पहिल्यांदाच दोन्ही गटांच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे दिवस एकच, मतदारसंघ सुद्धा एकच आणि कार्यक्रमाचा वेळ देखील एकच असणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोडमध्ये आज (सोमवारी) आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांची एकाचवेळी सभा होणार आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत… Continue reading पहिल्यांदाच दोन्ही गटांच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने

२०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार

दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र आणि अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून भारताने अर्थव्यवस्थेत तेजी आणणे अपेक्षित आहे. हे सर्व दशक संपण्यापूर्वी भारतातील विविध घटक आहेत जे २०३० मध्ये भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि स्टॉक मार्केट बनवू शकते, असे जागतिक गुंतवणूक बँक मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात असे म्हटले आहे. हे भारताचे दशक… Continue reading २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार

error: Content is protected !!