आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबई पोलिसांना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. आदित्य ठाकरे यांच्यावर आरे बचाव आंदोलनात मुलांचा मजूर म्हणून वापर केल्याचा आरोप आहे. आयोगाच्या या निर्देशांमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मुंबईची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याचा… Continue reading आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा

निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार

मुंबई (प्रतिनिधी) : येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. याबाबत ट्विट करुन त्यांनी माहिती दिली. पाटील यांनी म्हटले, ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७… Continue reading निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार

उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ७ खासदार गैरहजर

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या खासदारांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि राष्ट्रपती निवडणूक या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सोमवारच्या बैठकीला एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १२ खासदार बैठकीला उपस्थित, तर ७ खासदार गैरहजर होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाचे एक-दोन नव्हे, तर तब्बल १४… Continue reading उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ७ खासदार गैरहजर

सुप्रीम कोर्टाच्या फैसल्याचे होणारे परिणाम

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर प्रकरण कोर्टात गेल्याने सुप्रीम कोर्टाच्या फैसल्याचे तीन परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारने विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे; पण सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला नाही, तर त्याचा थेट परिणाम या सरकारच्या स्थैर्याला बसेल. यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत… Continue reading सुप्रीम कोर्टाच्या फैसल्याचे होणारे परिणाम

आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस : मनसेची पोस्ट

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्हदेखील गमवण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! ‘शिल्लकसेना’, अशी पोस्ट मनसेकडून पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगली ढवळून… Continue reading आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस : मनसेची पोस्ट

राज्यातील ९२ नगरपरिषदांची निवडणूक १८ ऑगस्टला

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार आहे. या निवडणुका जाहीर झाल्याने प्रशासकीय यंत्रणा गतिमान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २०  जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून,… Continue reading राज्यातील ९२ नगरपरिषदांची निवडणूक १८ ऑगस्टला

मुख्यमंत्री शिंदे यांना विठ्ठलाच्या महापूजेचा बहुमान

पंढरपूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रविवार, १० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. त्यामुळे यंदा आषाढी एकादशीची महापूजा कोण करणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती.… Continue reading मुख्यमंत्री शिंदे यांना विठ्ठलाच्या महापूजेचा बहुमान

संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्या नंतर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणी हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मेधा… Continue reading संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात नेणार : फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी कालव्याच्या माध्यमातून मराठवाड्यात नेले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  २०१९ मध्ये सांगली-कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा आपण जागतिक बँकेकडून एका प्रोजेक्टला मान्यता दिली होती. त्यात वळण-बंधारे आणि कॅनल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला होता. गुरुवारच्या बैठकीत… Continue reading पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात नेणार : फडणवीस

उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ असे मह्त्त्वपूर्ण विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (गुरुवारी) मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पूजेसाठी दीपक केसरकर हे उपस्थित होते. आजूबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावे, असा सल्लाही केसरकरांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी… Continue reading उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ : केसरकर

error: Content is protected !!