नामांतराचा प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्राकडे पाठवलेला नाही

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल राज्यासह देशातील ७ शहरांच्या नावामध्ये बदल करण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली; मात्र यात महाराष्ट्रातील औरंगाबाद व उस्मानाबादच्या बहुचर्चित नामांतराबाबतचा उल्लेख सरकारने केलेला नाही. याबाबत राज्य सरकारकडून आधी प्रस्ताव यावा लागतो. महाराष्ट्रातील सरकारकडून अद्याप तसा प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद… Continue reading नामांतराचा प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्राकडे पाठवलेला नाही

प्रत्येक शाळेने वृक्षारोपणात सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेऊन किमान ७५ झाडांची लागवड करावी आणि लावलेल्या झाडांना किंवा वनांना त्या-त्या भागातील स्वातंत्र्यसैनिकांची नावे द्यावीत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज (मंगळवारी) दिल्या. राष्ट्रीय हरित सेना योजना जिल्हास्तरीय अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची… Continue reading प्रत्येक शाळेने वृक्षारोपणात सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी   

खा. मंडलिक यांच्या मुरगूड निवासस्थानी बंदोबस्त

मुरगूड (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चेमुळे मंडलिक यांच्या मुरगूड येथील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून घडत असणाऱ्या राजकीय घडामोडीत आज राज्यातील शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. आज लोकसभेत तसे पत्र हे १२ खासदार… Continue reading खा. मंडलिक यांच्या मुरगूड निवासस्थानी बंदोबस्त

राष्ट्रपतीपदासाठी उत्साहात मतदान, २१ रोजी निकाल

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज (सोमवारी) निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये संसदेतील ९९.१८ टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली, तर महाराष्ट्रातील २८३ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे, तर २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. राष्ट्रपतीपदासाठी संध्याकाळी पाच वाजता मतदान संपले. या… Continue reading राष्ट्रपतीपदासाठी उत्साहात मतदान, २१ रोजी निकाल

औरंगाबादच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरास मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते, पण आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. उस्मानाबादचे नामांतर धाराशिव हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाणार आहे. आमच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला… Continue reading औरंगाबादच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरास मान्यता

कुरुंदवाड पालिकेत विसावा कक्षाची स्थापना

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व अभ्यागतांसाठी विसावा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पालिकेच्या कक्ष स्थापनेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. खास करून नागरिकांची नोंद ही या ठिकाणी होणार आहे. संबंधित विभागातील कामाबाबत मार्गदर्शनही त्याठिकाणी मिळणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या आणि महापुराच्या काळात नागरिकांना सहजरीत्या मदत व्हावी, यादृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या… Continue reading कुरुंदवाड पालिकेत विसावा कक्षाची स्थापना

शिरोळ तालुक्यात प्रशासन यंत्रणा सतर्क : आ. यड्रावकर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : मुसळधार पाऊस पाहता पूरपरिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती शिरोळ तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे. पुराचे संकट ओढवले, तर त्यावर मात करण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याची माहिती शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता संभाव्य परिस्थितीवर लक्ष ठेवत शासन आणि प्रशासनाने दिलेले निर्देश पाळत संकटाला सामोरे जाण्याची… Continue reading शिरोळ तालुक्यात प्रशासन यंत्रणा सतर्क : आ. यड्रावकर

‘गोडसाखर’ निवडणुकीसाठी एकूण २६३ अर्ज दाखल

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याची (गोडसाखर) निवडणूक प्रक्रिया सुरु असून, ११ जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी ५३ जणांनी २५ दुबार अर्जासह ७८ अर्ज दाखल केले. दरम्यान, आज (शुक्रवारी) शासनाच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया थांबण्यात आली असून, आता छाननीसह पुढील प्रक्रिया ३० सप्टेंबरनंतर होणार आहे.… Continue reading ‘गोडसाखर’ निवडणुकीसाठी एकूण २६३ अर्ज दाखल

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई (प्रातिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत ढकलल्या आहेत.… Continue reading सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महापालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, नद्यांची पाणीपातळी तसेच जिल्ह्यातील कोणते… Continue reading आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : जिल्हाधिकारी

error: Content is protected !!