कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महापालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, नद्यांची पाणीपातळी तसेच जिल्ह्यातील कोणते मार्ग सुरू आहेत किंवा कोणते मार्ग बंद आहेत इत्यादी बाबतच्या माहितीसाठी नागरिकांनी या विभागांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय- टोल फ्री क्रमांक- १०७७, दूरध्वनी क्रमांक- २६५९२३२/ २६५२९५०/ २६५२९५३/ २६५२९५४, जिल्हा परिषद- आरोग्य- २६६१६५३, पोलिस विभाग- २६६२३३३/११२, सार्वजनिक बांधकाम- २६५१४५७, जिल्हा परिषद बांधकाम- ९९७५०९८६८९ (सचिन खाडे), राष्ट्रीय महामार्ग- २६५२९६०, पाटबंधारे- २६५४७३६ महावितरण- ७८७५७६९१०३.