महाआवास अभियानामध्ये गगनबावडा राज्यात द्वितीय

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्याला सन २०२०-२१ मध्ये राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांच्या हस्ते गटविकास अधिकारी माधुरी आर.परीट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या अभियानामध्ये गगनबावडा तालुक्यातील सभापती, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य, विस्तार अधिकारी अरुण बिडवे,… Continue reading महाआवास अभियानामध्ये गगनबावडा राज्यात द्वितीय

कोल्हापूर जिल्हा परिषद बहुमजली इमारतीमध्ये राज्यात प्रथम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाआवास अभियान २०२०-२१ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेस केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार बहुमजली इमारती बांधणे यामध्ये राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे स्वीकारणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदमधील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी दिली… Continue reading कोल्हापूर जिल्हा परिषद बहुमजली इमारतीमध्ये राज्यात प्रथम

पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेजचे यश

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘होते असे कधी कधी’ या एकांकिकेने सांघिक तृतीय क्रमांक मिळवला. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाविद्यालयाची निवड झाली असून, या एकांकिकेचे लेखक विद्यार्थी संग्राम देसाई यांना ‘उत्कृष्ट लेखक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रीय कलोपासक पुणे, गायन समाज देवल क्लब… Continue reading पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेजचे यश

खर्चाचा हिशेब मुदतीत न देणारे निवडणूक लढवण्यास अपात्र

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब मुदतीत सादर केला नाही, अशी व्यक्ती राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पाच वर्षांच्या कालावधीकरीता पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र असेल. अपात्र उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी… Continue reading खर्चाचा हिशेब मुदतीत न देणारे निवडणूक लढवण्यास अपात्र

रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेटपटू रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्रिकेट प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे ते आजवरचे सहावे प्रशिक्षक ठरले आहेत. रोहित शर्माच्या आजवरच्या कारकीर्दीत लाड यांचे योगदान फार मोठे आहे. रोहितला घडवण्याच त्यांचा मोठा वाटा आहे. याचाच सन्मान म्हणून आणि त्यांच्या क्रिकेटमधल्या योगदानासाठी यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी दिनेश… Continue reading रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कबुतराचे नाव

पुणे (प्रतिनिधी) : पशु-पक्षी पाळणे हा अनेकांचा छंद असतो त्यामाध्यमातून अनेक नागरिक आपल्या पशु पक्षामुळे नावारूपाला येत असतात नुकतेच पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील एका कबुतराने आपल्यासह आपल्या मालकाचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केले आहे. तळेगाव ढमढेरे येथील सोयब बागवान या युवकाला कबुतरे पाळण्याचा छंद असून त्याने अनेक कबुतरे पाळलेली आहेत. त्यापैकी काही कबुतरे शर्यतीमध्ये… Continue reading वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कबुतराचे नाव

डॉ. उमेश कळेकर यांचा हेल्थ आयकॉन पुरस्काराने सन्मान

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ येथील प्रसिद्ध वंधत्व तज्ञ,  रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य यांना वंधत्व उपचार उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ उमेश दत्त कळेकर यांना आयकॉन २०२२ हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोषारी यांच्या हस्ते पुणे येथे नुकताच देण्यात आला.

error: Content is protected !!