मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेटपटू रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्रिकेट प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे ते आजवरचे सहावे प्रशिक्षक ठरले आहेत.

रोहित शर्माच्या आजवरच्या कारकीर्दीत लाड यांचे योगदान फार मोठे आहे. रोहितला घडवण्याच त्यांचा मोठा वाटा आहे. याचाच सन्मान म्हणून आणि त्यांच्या क्रिकेटमधल्या योगदानासाठी यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी दिनेश लाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.