वनरक्षक गणेश रणदिवे यांचा सुवर्ण पदकाने सन्मान 

पंढपूर (प्रतिनिधी) : नागपुर याठिकाणी राज्य शासनाचेवतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावातील गणेश रणदिवे यांनी धुळे जिल्ह्यात सहाय्यक वनसंरक्षक पदावर कार्यरत असताना केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या  वतीने नागपूर याठिकाणी सुवर्ण पदक देवुन सन्मान त्यांचा करण्यात आला. रणदिवे यांनी २०१८-२०१९ वर्षासाठी वन्य आणि वन्यजीव संरक्षणात उत्कृष्ट कार्य… Continue reading वनरक्षक गणेश रणदिवे यांचा सुवर्ण पदकाने सन्मान 

राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : दि ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सुरेखा कटारिया व डॉ. सुनीता बोरा, कल्पना कर्नावट, साधना सावणे या… Continue reading राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर

कोल्हापूरची सौंदर्या पाटील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तृतीय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिराराम गर्ल्स हायस्कूलमध्ये नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला असून, आज (बुधवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीतील चार… Continue reading कोल्हापूरची सौंदर्या पाटील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तृतीय

धुळे येथे पैलवान खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिध) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) या नावाने शासकीय कुस्तीचे स्पर्धेचे आयोजन धुळे जिल्ह्यात केले आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून पुरूष व महिला असे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाने सातत्याने पाठपुराव केला होता. फ्री स्टाईल गटात १०० पुरुष खेळाडू,… Continue reading धुळे येथे पैलवान खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे आयोजन

पी. ए. पाटील यांना शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे दिला जाणारा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार पत्रकार पी. ए. पाटील यांच्या ‘रग तांबड्या मातीची.. झुंज वाघाची’ या साहित्यकृतीला जाहीर झाला आहे. हे पुस्तक महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशिलकर यांच्या जीवनावर आधारित आहे. पी. ए. पाटील व सदानंद पुंडपाळ यांनी हे पुस्तक लिहिले आहे.… Continue reading पी. ए. पाटील यांना शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार

आरोग्य चित्रपट महोत्सवात नजरिया लघुचित्रपटचा द्वितीय क्रमांक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकताच जगभरातील सुमारे १३० लघुचित्रपटांमधून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ३१ लघुचित्रपटातून ‘नजरिया’ या कोल्हापूरमध्ये तयार झलेल्या हिंदी लघुचित्रपटाला पुणे येथील मानांकित ११ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवात वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत व लेखक/अभिनेता ऋषीकेश जोशी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट म्हणून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामुळे कोल्हापूर कला क्षेत्रातून… Continue reading आरोग्य चित्रपट महोत्सवात नजरिया लघुचित्रपटचा द्वितीय क्रमांक

पन्हाळा नगरपरिषदेला दीड कोटीचे बक्षीस

पन्हाळा ( प्रतिनिधी ) : पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्य शासनाच्या माझी वसुंधरा- २ अभियानामध्ये पुणे विभागात प्रथम क्रमांक तर राज्यामध्ये नगरपरिषद या कॅटेगरीमध्ये राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. दरम्यान, या स्पर्धेच्या बक्षिसाचीही शासनाने घोषणा केली असून, यात पन्हाळा नगरपरिषदेस दीड कोटी रुपयांचे रोख बक्षीस प्राप्त झाले आहे. निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी… Continue reading पन्हाळा नगरपरिषदेला दीड कोटीचे बक्षीस

गगनबावडा पंचायत समिती सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित  

गगनबावडा (प्रतिनिधी) : ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाअवास अभियान- ग्रामीण २०२१-२२ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात विविध उपक्रमाद्वारे यशस्वीपणे राबवल्यामुळे पुणे विभाग स्तरावर पंचायत समिती गगनबावड्याची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट पंचायत समिती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेची (ग्रामीण)… Continue reading गगनबावडा पंचायत समिती सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित  

कमी खर्चात जास्त उत्पादनानेच ऊसशेती परवडेल : मुश्रीफ  

कागल (प्रतिनिधी) : कमी क्षेत्रफळात व कमीत कमी खर्चात जास्त उत्पादनानेच ऊसशेती परवडेल, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. उत्पादन वाढीसाठी जे जे करायला लागेल ते करू. शेती परवडायची असेल, तर जास्तीत जास्त उत्पादन घेऊया, असेही ते म्हणाले. कागलमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात… Continue reading कमी खर्चात जास्त उत्पादनानेच ऊसशेती परवडेल : मुश्रीफ  

लालपरीच्या शिलेदारांचा दिल्लीमध्ये सत्कार

मुंबई (प्रतिनिधी) : देशातील लालमातीचा रस्ता असो की डांबरी रस्ता लालपरी मुक्कामी वेळेत पोहोचवते अशी तिची ख्याती आहे. एसटीची विश्वासार्हता टिकवणाऱ्या ३० शिलेदारांचा नवी दिल्लीत गौरव केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या परीची ही विश्वासार्हता एस.टी. महामंडळाने इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर कमावली आहे. विश्वासार्हतेच्या याच ‘यूएसपी’ला आता राष्ट्रीय पातळीवर गौरवले जाणार आहे. एस.टी. महामंडळाकडे १८ हजार बसेसचा… Continue reading लालपरीच्या शिलेदारांचा दिल्लीमध्ये सत्कार

error: Content is protected !!