भिवंडी येथे चार मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले…

भिवंडी (प्रतिनिधी) : आईसह तीन चिमुकल्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. ही घटना भिवंडीतील उबंरखांड पाच्छापूर जंगलात घडली आहे. पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडिलांनी देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न… Continue reading भिवंडी येथे चार मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले…

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने पारित केलेल्या नवी कृषी विधेयकाच्या कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन आणखीनच तीव्र होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन कायद्यात काही कमतरता असेल तर सरकार चर्चेसाठी तयार आहे. शेतकरी संघटनांनी खुल्या मनाने चर्चेसाठी यावं असं आवाहन केलं. मात्र शेतकरी संघटनांनी सरकारचं हे आवाहन… Continue reading शेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम

‘मतांसाठीच राजीव गांधींच्या हत्येचा तपास गांभीर्याने झाला नाही…’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमिळनाडूतील श्री पेरुम्बुदूर येथे २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून हत्या केली होती. वास्तविक, त्यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची पूर्वसूचना एक वर्षापूर्वी मिळाली होती, मात्र तत्कालीन द्रमुक सरकारने तमिळींच्या मतांसाठी याकडे साफ दुर्लक्ष केले आणि गांधी यांच्या हत्येचा तपास गांभीर्याने केला नाही, असा… Continue reading ‘मतांसाठीच राजीव गांधींच्या हत्येचा तपास गांभीर्याने झाला नाही…’

शरद पवार आता ‘यूपीए’चे नवे सेनापती..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसला साथीला घेऊन तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा नवा प्रयोग यशस्वी करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आता यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा नवा प्रस्ताव समोर आला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार हे ‘यूपीए’चे नवे सेनापती होऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली… Continue reading शरद पवार आता ‘यूपीए’चे नवे सेनापती..?

नव्या कृषी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. या विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता केरळ सरकारही उतरल्याचे दिसून आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सुरुवातीपासूनच या कायद्यांच्या… Continue reading नव्या कृषी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

‘आत्मनिर्भर’ भारत ; आता भारतातच तयार होणार मोबाइलचे पार्ट्स

मुंबई (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस भारत देश खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ बनण्यासाठी वाटचाल करत आहे. भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे. भारतातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्यासाठी टाटा सन्स तामिळनाडूमध्ये मोठा प्रकल्प… Continue reading ‘आत्मनिर्भर’ भारत ; आता भारतातच तयार होणार मोबाइलचे पार्ट्स

सर्वोच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामी यांना झटका…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्याप्रकरणी जामिनावर सुटलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशा मागण्याची… Continue reading सर्वोच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामी यांना झटका…

कोरोनाची दुसरी लाट..? ; मोदींनी ४ डिसेंबरला बोलावली सर्वपक्षीय बैठक

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  तर काही राज्यांमध्ये पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारी घेत उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी ४ डिसेंबररोजी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व खासदारांसोबत… Continue reading कोरोनाची दुसरी लाट..? ; मोदींनी ४ डिसेंबरला बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली येथे शेतकरी आक्रमक…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या जनजीवनावर झाल्याचं दिसून येतंय. शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं… Continue reading नवी दिल्ली येथे शेतकरी आक्रमक…

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमवर लैंगिक शोषणाचा आरोप…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम याच्यावर एका महिलेनं पत्रकार परिषद घेत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील मैत्रीण असल्याचे सांगितलं. तसेच आजमला वेळोवेळी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेने केला आहे. महिलेने सांगितले की, बाबर आजमला मी शाळेत असल्यापासून ओळखतेय. आम्ही एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे… Continue reading पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमवर लैंगिक शोषणाचा आरोप…

error: Content is protected !!