अर्णब गोस्वामींना दणका : ‘ऑफकॉम’ ने ठोठावला लाखोंचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाने (ऑफकॉम)  तब्बल २० हजार पौंड (१९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारताची भागीदारी आहे.  ६ डिसेंबरला रिपब्लिक भारतचा ‘पूंछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित झाला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त… Continue reading अर्णब गोस्वामींना दणका : ‘ऑफकॉम’ ने ठोठावला लाखोंचा दंड

मटकाकिंगच्या भावानेच दिली वहिनीसह तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी…

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने मटकाकिंग सुरेश भगत याची पत्नी आणि तिची बहिणीच्या हत्येची ६० लाखांची सुपारी दिल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक केली असून सुरेश भगत याच्या भावानेच या दोघींच्या हत्येची सुपारी दिल्याची खळबळजनक माहिती तपासात पुढे आल्याचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.… Continue reading मटकाकिंगच्या भावानेच दिली वहिनीसह तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी…

सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई १० वी आणि १२ बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता. याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. पोखरियाल यांनी आज (मंगळवार) देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधताना हे… Continue reading सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

लंडनहून आलेल्या विमानातील काहीजण कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आढळल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या विमानात एकूण २६६ जण होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांचा नमुने संशोधनासाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC)कडे पाठवण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीतील कोविड-१९ च्या… Continue reading लंडनहून आलेल्या विमानातील काहीजण कोरोना पॉझिटिव्ह

‘आरएसएस’चे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

नागपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, ज्येष्ठ विचारवंत, तरुण भारतचे माजी संपादक  मा. गो. वैद्य यांचे आज (शनिवार) दुपारी अल्पशा निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, तीन मुली, नातेवाईक असा मोठा परिवार आहे. नागपूर येथील अंबाझरी घाटावर उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

देशवासीयांना लॉकडाऊनबाबतची पूर्वकल्पना द्यायला हवी होती..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्गदर्शक तत्त्वांंअभावी देशात कोरोना वणव्यासारखा पसरला. देशवासीयांना लॉकडाऊनबाबतची पूर्वकल्पना द्यायला हवी होती, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात राज्ये आणि केंद्र सरकारमध्ये संवाद नव्हता, असेही ताशेरे न्यायालयाने मारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून कोरोनाबाबत सरकारची कानउघाडणी करण्यात आली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मार्गदर्शक तत्त्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन झाले… Continue reading देशवासीयांना लॉकडाऊनबाबतची पूर्वकल्पना द्यायला हवी होती..!

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २ हजार रुपये…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ डिसेंबर रोजी वर्षातील तिसरा २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. ते आज (शुक्रवार) मध्य प्रदेशमधील किसान महासंमेलनात बोलत होते. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.… Continue reading शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २ हजार रुपये…

वादग्रस्त कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करा : सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. यावर न्यायालयानं आंदोलन मूलभूत अधिकार असला, तरी इतरांना त्रास व्हायला नको, असं निर्देश दिले. तसेच वादग्रस्त ठरलेल्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल विचार करावा, असा सल्ला न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.… Continue reading वादग्रस्त कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करा : सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

‘या’ गावात हुंडा म्हणून दिला जातो २१ साप…

मुंबई (प्रतिनिधी) :  आपल्या देशात हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. परंतु, भारतामध्ये मध्य प्रदेश येथील गौरिया जमातीमध्ये हुंडा म्हणून चक्क २१ विषारी साप देण्याची प्रथा आहे. हे साप दिले नाहीत तर लग्नात अपशकुन होतो अशी त्यांची धारणा आहे. मध्य प्रदेश येथील गौरिया जमातीमध्ये हुंडा म्हणून २१ विषारी साप दिले जातात. हे साप वधुपिता… Continue reading ‘या’ गावात हुंडा म्हणून दिला जातो २१ साप…

सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोन आठवड्याहून अधिक काळ दिल्ली येथील सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी धक्कादायक घटना घडली. एका शेतकऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. पानिपतच्या पार्क रुग्णालयामध्ये शेतकऱ्याचा मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी सोनिपत पोलीस तपास करत असून संबधित शेतकरी हा कर्नालमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. अद्याप त्या शेतकऱ्याचे नाव… Continue reading सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

error: Content is protected !!