धक्कादायक..! ऊस ट्रॉली अंगावर पलटी झाल्याने शेडबाळच्या चार महिला ठार

कागवाड ( प्रतिनिधी ) कागवाडवून उगार शुगरला उसाची वाहतूक केली जाते. या पार्श्वभूमीवर आज एक ट्रॅक्टर ट्रॉली रोडबाळनजीक इंदिरानगरजवळ आला असता ट्रॉली रस्त्याकडेने चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावर कोसळल्याने अपघात झाला असून, यात चार महिला ठार झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने कागवाड पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 5… Continue reading धक्कादायक..! ऊस ट्रॉली अंगावर पलटी झाल्याने शेडबाळच्या चार महिला ठार

पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर महामार्गावर आज (रविवार) उजळाईवाडीजवळ दुचाकीला मागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. सर्जेराव पाटील (वय 62, रा. भादुले) हे जागीच ठार झाले. तर किरण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास… Continue reading पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

शिरढोण येथे झालेल्या अपघातात एक युवक ठार

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) मोटारसायकलवरुन प्रवास करत असताना बुधवार दि. 31 जानेवारी रोजी रात्री शिरढोण पंचगंगा नदीवरील पुलाच्या कठड्याला जोराची धडक दिल्याने योगेश बसाप्पा टाकवडे (वय 27 रा. शिरढोण) हे गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली आहे. गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी टाकवडे… Continue reading शिरढोण येथे झालेल्या अपघातात एक युवक ठार

धक्कादायक..! वाठार–भादोले रोडवर दुचाकीची ट्रॉलीला धडक; काखेतील युवक ठार

भादोले ( प्रतिनिधी ) वाठार – भादोले रोडवर ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडकल्याने एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी हा अपघात झाला आहे. यात ठार झालेल्या युवकाचे नाव सुनील शामराव जाधव (वय 27, रा. चांदोली वसाहत, ता. पन्हाळा ) आहे. हा अपघात भीषण असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात… Continue reading धक्कादायक..! वाठार–भादोले रोडवर दुचाकीची ट्रॉलीला धडक; काखेतील युवक ठार

वाठार-वारणानगर रस्त्यावर अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू

पन्हाळा (प्रतिनिधी) : वाठार-वारणानगर रस्त्यावर आज (गुरुवार) सकाळी मोटरसायकल आणि ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुनिल शामराव जाधव (वय 27, रा. चांदोली वसाहत काखे, ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सुनिल जाधव हा वाठार-भादोले रस्त्यावरील कारखान्यात कामाला होता. ते नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकी क्र. (एमएच 09 जीके… Continue reading वाठार-वारणानगर रस्त्यावर अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू

अज्ञात मोटरसायकलस्वाराच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ बोरगाव येथे एका शाळकरी विद्यार्थ्याला अज्ञात मोटरसायकलस्वाराने मागून धडक दिली. या अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. तर त्या जखमी विद्यार्थ्याला तिथेच टाकून मोटरचालकाने पळ काढल्याची घटना घडली आहे. कळे पोलिसांची माहितीनुसार, पोहाळे तर्फ बोरगाव येथील प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणारा बुद्धभूषण सतीश माळवी (वय ९) हा जेवणाचे… Continue reading अज्ञात मोटरसायकलस्वाराच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी…

मलकापूरजवळ कंटेनर खाली सापडून महिला ठार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रत्नागिरी महामार्गावर मलकापूर शहरानजीक शाळी नदीवर असलेल्या पुलावर कंटेनर खाली सापडून शाहूवाडी तालुक्यातील टेकोली येथील उल्हासीबाई यशवंत कांबळे (वय ६५) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली. बेदरकार कंटेनर चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाविरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. अपघात घडल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. हा कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला. शुक्रवारी दुपारी कोल्हापूरच्या… Continue reading मलकापूरजवळ कंटेनर खाली सापडून महिला ठार

विचारेमाळमध्ये आगीत लाखो रुपये किमतीच्या साड्या खाक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील विचारेमाळ परिसरातील धरतीमाता हौसिंग सोसायटीत साड्यांना इस्त्री करताना शार्ट सर्कीटने लागलेल्या आगीत लाखो रुपये किमतीच्या साड्या, शिलाई मशिन्स, प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. विचारेमाळ परिसरातील धरतीमाता हौसिंग सोसायटीमध्ये सुनीता कांबळे यांच्या मालकीचे दोन मजली घर आहे. या घराच्या दुसऱ्या… Continue reading विचारेमाळमध्ये आगीत लाखो रुपये किमतीच्या साड्या खाक

हलकर्णी फाटा येथील घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

PRasad - 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथील सूर्यकांत महागावकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये प्रापंचिक साहित्यासह मौल्यवान वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या. मात्र, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. दौलत- अथर्व प्रशासनाने पाठवलेल्या पाण्याचा टँकर आणि चंदगड नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने ही आग आटोक्यात आली. गुरुवारी रात्री ३ वाजण्याच्या… Continue reading हलकर्णी फाटा येथील घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

कोल्हापुरातील निर्माण चौकात बस-दुचाकीचा अपघात : एकाचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाजीनगर येथील निर्माण चौक याठिकाणी आज सकाळी आठच्या सुमारास एसटी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. विनायक बळवंत खाडे (वय 67, रा. जरगनगर, कोल्हापूर) असे या मृत व्यक्तिचे नाव आहे. आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरकडून गारगोटीकडे जाणारी एसटी संभाजीनगरकडे जात होती. यावेळी निर्माण चौक येथे एसटीने एका… Continue reading कोल्हापुरातील निर्माण चौकात बस-दुचाकीचा अपघात : एकाचा मृत्यू

error: Content is protected !!