ट्रकच्या धडकेत उचगावचा दुचाकीस्वार ठार

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप चौकात दुचाकीवरून रस्ता ओलांडणाऱ्या उचगाव येथील युवकाचा आयशर ट्रकने धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत विशाल रामा वाळकुंजे ( वय १९) हा उचगाव येथील रहिवासी असून, तो कामानिमित्त टोप येथील बिरदेव मंदिर परिसरात आपल्या नातेवाइकांकडे आला होता. आपले काम उरकून तो उचगावकडे जाण्यासाठी रविवारी दुपारी ४… Continue reading ट्रकच्या धडकेत उचगावचा दुचाकीस्वार ठार

नुपूर शर्मा विरोधात देशभर निदर्शने, आंदोलनाला हिंसक वळण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली असून, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातही ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. बहुतांश ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूर आदी ठिकाणी मुस्लिम समाजाने मोर्चा काढून… Continue reading नुपूर शर्मा विरोधात देशभर निदर्शने, आंदोलनाला हिंसक वळण

वाडीचरण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे आज (सोमवार) वाडीचरण येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्या वाहनधारकाला आपला पाय गमवावा लागला आहे. आकाश अशोक चोपडे (वय ३०, रा. सागांव, ता. शिराळा, जि. सांगली) असे त्यांचे नाव असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चोपडे आणि त्यांचे मित्र मयूर मंगेश कांबळे… Continue reading वाडीचरण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक…

कोल्हापूरजवळ पुईखडी येथे अपघात : दोन तरूणांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुईखडी घाटात कार उलटून झालेल्या अपघातात कोल्हापुरातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मित्रांसमवेत पार्टी करून हे पाचही मित्र कारने कोल्हापूरला येत होते. शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले. या अपघातात शुभम हेमंत सोनार (वय २४, रा. राजारामपुरी), शंतनू शिरीष कुलकर्णी (वय २८, रा.… Continue reading कोल्हापूरजवळ पुईखडी येथे अपघात : दोन तरूणांचा मृत्यू

कासेगावजवळ अपघात : जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील ५ जण ठार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर महामार्गावर कासेगावजवळील येवलेवाडी येथे थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने कारमधील पाच जण जागीच ठार झाले. ठार झालेले पाचही जण जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. हा अपघात आज (शनिवार) दुपारच्या दरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात अरिंजय आण्णासाहेब शिरोटे (वय ३८), स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरू अभिनंदन शिरोटे (वय… Continue reading कासेगावजवळ अपघात : जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील ५ जण ठार…

error: Content is protected !!