मुख्यमंत्री केजरीवालांच्या पीएकडून मारहाण ; आपच्या महिला खासदाराचा आरोप

दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका खासगी स्विय सहायकाने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पी.ए विभव कुमार यांनी मारहाण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. या गंभीर आरोपाने दिल्लीच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,… Continue reading मुख्यमंत्री केजरीवालांच्या पीएकडून मारहाण ; आपच्या महिला खासदाराचा आरोप

मतदान केंद्रावर गेले पण… ; गायिका सावनी रविंद्र मतदानापासून वंचित

मुंबई : राज्यात आज सकाळी 7 वाजल्यापासून चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. अनेकजण आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीदेखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर, काहींना मतदारयादीत नाव नसल्याचा फटका बसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्रला देखील असाच अनुभव… Continue reading मतदान केंद्रावर गेले पण… ; गायिका सावनी रविंद्र मतदानापासून वंचित

राज्यात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप सुरू ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई : राज्यात आज सोमवारी (ता. 13 मे) चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकूण 11 मतदारसंघामध्ये ही मतदान प्रक्रिया होत असून त्याआधी राज्यात पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ उडाला आहे. तर शिरूरचे आणि अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि निलेश लंके यांनी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. यातच शिवसेना… Continue reading राज्यात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप सुरू ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुख्यमंत्री शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांच्या बॅगा ? ; संजय राऊतांकडून व्हिडीओ ट्विट

मुंबई  : राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी नाशिकमध्ये जाताना आपल्यासोबत पैशांने भरलेल्या बॅगा सोबत आणल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. राज्यभरात भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी… Continue reading मुख्यमंत्री शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांच्या बॅगा ? ; संजय राऊतांकडून व्हिडीओ ट्विट

2014 साली मोदींना पाठींबा दिला ते मी पाप मानतो : उद्धव ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी सामनाला दोन भागामध्ये मुलाखत दिली.त्याचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला.यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संधान साधले.2014 साली भाजपाने शिवसेनेशी युती तोडल्याचा मुद्दा मांडताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. “2014 साली मोदींच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा देण्याचं पहिलं पाप शिवसेनेनं केलं. मी ते पापच मानतो कारण आता… Continue reading 2014 साली मोदींना पाठींबा दिला ते मी पाप मानतो : उद्धव ठाकरे

कुप्रसिद्ध जर्मनी गँग विरोधात मोक्कांतर्गत कारवाई

कोल्हापूर : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह जिल्हा परिसरातील शरिराविरुध्दच्या व मालाविरुध्दच्या गुन्ह्यांसह अवैध व्यवसायामध्ये सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या तसेच समाजकंटक गुन्हेगारांच्या वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक लाभासह इतर लाभ संपादन करण्यासाठी  गुन्हे करणा-या गुन्हेगार व टोळ्यांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम… Continue reading कुप्रसिद्ध जर्मनी गँग विरोधात मोक्कांतर्गत कारवाई

उद्धव ठाकरेंच मोठं विधान ,म्हणाले पक्ष आणि चिन्ह…

मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं असून उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक, केंद्र सरकारची दडपशाही तसेच फोडाफोडीच्या राजकारणावर सविस्तर भाष्य केले. यावेळी… Continue reading उद्धव ठाकरेंच मोठं विधान ,म्हणाले पक्ष आणि चिन्ह…

…मग तुझ्या पोराला का निवडून आणला नाही : जितेंद्र आव्हाड

ठाणे : “ते आता डोस देत सुटलेत. तुला पाडेन, तुला पाडेन. मग तुझ्या पोराला का निवडून आणला नाही. लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता?” असा सवाल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा उद्या (13 मे) चौथा टप्पा पार पडणार आहे. महाराष्ट्रात सगळ्याच पक्षांनी प्रचाराला वेग धरला आहे.… Continue reading …मग तुझ्या पोराला का निवडून आणला नाही : जितेंद्र आव्हाड

मोदींबाबत ‘ही’ भीती उद्धव ठाकरेंच्या मनात..? केला मोठा खुलासा…

मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापल्याच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र लोकसभेचा जोरदार प्रचार सुरु आहे . प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाहीयत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर राजकीय वातावरण ढवळलं आहे. या… Continue reading मोदींबाबत ‘ही’ भीती उद्धव ठाकरेंच्या मनात..? केला मोठा खुलासा…

‘देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चं मडकं’ ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धामधूम सुरू आहे.नेते राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत.या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांना 1999 पासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडत होतं, अशी टीका केली होती. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी… Continue reading ‘देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चं मडकं’ ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

error: Content is protected !!