मुंबई (प्रतिनिधी) : आज शेअर बाजारात सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीचे संकेत दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९३.१६अंकांनी वधारत ६०,४०८ अंकांवर खुला झाला, तर एनएसई निर्देशांक निफ्टी १०८.१० अंकांनी वधारत १८,०४४ अंकांवर खुला झाला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ४२३ अंकांच्या ६०.५३८ .८६ अंकावर व्यवहार करत होता, तर निफ्टी १२२ अंकांनी वधारत १८,०५८.४० अंकांवर व्यवहार करत होता.

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये जवळपास एक टक्क्यांची, तर वित्तीय क्षेत्रात ०.९३ टक्क्यांची तेजी दिसत आहे. मेटल, बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. आयटी सेक्टरमध्ये ०.४४ टक्क्यांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकामधील जवळपास सर्वच ३० कंपन्यांच्या शेअर दरात वाढ दिसून येत आहे. यामध्ये भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी आणि कोटक बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन, आयटीसी, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा एल अँड टी, विप्रो, टाटा स्टील, रिलायन्स, एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.