कोल्हापूर ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून, यामध्ये पहिल्या 40 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, राजनाथसिंह, नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा यामध्ये समावेश असून, याच यादीमध्ये कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा ही समावेश आहे.

यादीतील पहिली 20 नावे पुढीलप्रमाणे

१) नरेंद्र मोदी
२) जे.पी. नड्डा
३) राजनाथ सिंह
४) अमित शाह
५) नितीन गडकरी
६) योगी आदित्यनाथ
७) प्रमोद सावंत
८) भुपेंद्र पटेल
९) विष्णू देव साई
१०) डॉ. मोहन यादव
११) भजनलाल शर्मा
१२) रामदास आठवले
१३) नारायण राणे
१४) अनुराग ठाकूर
१५) ज्योतिरादित्य सिंधिया
१६) स्मृती इराणी
१७) शिवराज चौहान
१८) के. अण्णमलई
१९) रवि किशन
२०) मनोज तिवारी