कोल्हापूर (प्रतिनिधी) : फेरीवाले, भाजी विक्रेते, शेतकरी अशा लघु उद्योगांना चालना देण्यासाठी आणि भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. स्वदेशीचा वापर जास्तीत जास्त व्हावा या उद्देशाने आत्मनिर्भर भारत अभियान सुरू झाले. दरम्यान, आज (शनिवार) भाजपा कोल्हापूरच्या वतीने या आत्मनिर्भर भारत अभियानास बिंदू चौक येथून सुरुवात करण्यात आली.

यावेळी प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते फीत कापून हा शुभारंभ करण्यात आला. संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.

यावेळी महेश जाधव म्हणाले की, देश विकासाच्या सक्षम निर्णयांमुळे भारताचे पंतप्रधान हे आता जागतीक द्दर्जाचे नेतृत्व झाले आहे. तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या या योजना सर्वसामान्य नागरीकाला रोजगाराच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी लाभदायी ठरत आहेत.या योजना समजून घेऊन लोकांना बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. भाजपाच्या ७ मंडलामध्ये या अभियानासाठी स्वतंत्र ऑफिस सुरु करून या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

राहूल चिकोडे म्हणाले की, आत्मनिर्भर भारत हे पॅकेज सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोचवण्याचे संघटनात्मक काम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्राथमीक जबाबदारी आहे. आपल्याकडे ७०% लोक शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. शेतकरी विधेयक हे शेतक-यांच्या फायद्याचे असताना देखील विरोधी पक्ष फक्त विरोध म्हणून यामध्ये शेतक-यांची दिशाभूल करीत आहेत. शेतीसाठी आवश्यक जी तीन विधयके पारीत झाली ती बांधापर्यंत नेणे गरजेचे आहे. उद्यापासून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भाजपा जिल्हा कार्यालय, बिंदू चौक येथे याविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी सरचिटणीस हेमंत आराध्ये, गणेश देसाई,  भाजपा गटनेते अजित ठाणेकर, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, विजय अगरवाल, सचिन तोडकर, जिल्हा चिटणीस प्रमोदिनी हार्डीकर, सुलभा मुजूमदार, प्रदीप उलपे, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.