विशाळगड अतिक्रमणाचा विषय ८ दिवसांत मार्गी लावू : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे, समाधी यांची दुरवस्था, पुरातत्व खात्याचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग यांची ८ दिवसांच्या आत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू, असे आश्‍वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (मंगळवार) कृती समितीला दिले. विशाळगड येथील अतिक्रमणाबाबत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन… Continue reading विशाळगड अतिक्रमणाचा विषय ८ दिवसांत मार्गी लावू : पालकमंत्री

‘लॉकडाऊन’बाबत आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा आणि इतर परिणामांचा विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर वरिष्ठ मंडळींशी चर्चा करून राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत ठरवतील. मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाउनचा अधिकार असतो. लॉकडाउन हा तर शेवटचाच पर्याय असतो. त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले की,… Continue reading ‘लॉकडाऊन’बाबत आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

खासगी, निमशासकीय क्षेत्रातील पेन्शनधारकांना ९ हजार पेन्शन द्या : खा. माने

शिरोळ (प्रतिनिधी) : देशातील खासगी व निमशासकीय क्षेत्रातील ६७ लाख पेन्शन धारकांना आत्मनिर्भरपणे जगता यावे, यासाठी प्रतिमहा ९ हजार पेन्शन करावी, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत शुन्य प्रहारात केली. खा. माने यांनी संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनात पेन्शन सारख्या महत्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभर… Continue reading खासगी, निमशासकीय क्षेत्रातील पेन्शनधारकांना ९ हजार पेन्शन द्या : खा. माने

शरद पवारांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : मला वाटतं शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेलेली नाही. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली गेली. हे आता उघड झालं आहे,  असा आरोप  वेगवेगळी कागदपत्रे सादर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केला. फडणवीस म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांच्यासह काहीजणांना अटक केली… Continue reading शरद पवारांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली : देवेंद्र फडणवीस

ए भाई, माझ्यावर बोट उचलायचं नाही : अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक, अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही,  अशा  एकेरी शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना इशारा दिला  आहे. देवेंद्र फडणवीस यांनी… Continue reading ए भाई, माझ्यावर बोट उचलायचं नाही : अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘चकोते ग्रुप’कडून एकाच दिवशी २५ शहरांमध्ये रक्तदान शिबिर

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : चकोते ग्रुप व गणेश बेकरीचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब चकोते यांचा बुधवारी (दि. २४) वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नांदणीबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक येथील २५ शहरांमध्ये एकाच दिवशी शिबिर होणार आहे. आतापर्यंत चकोते ग्रुपने विधायक उपक्रम राबविले आहेत. रक्ताची  वाढती गरज ओळखून २५ शहरामध्ये शिबिर घेण्यात येणार… Continue reading ‘चकोते ग्रुप’कडून एकाच दिवशी २५ शहरांमध्ये रक्तदान शिबिर

शिरोळ तालुक्यातील ‘हा’ प्रेमवीर कोण..?

शिरोळ (प्रतिनिधी) : युद्धात आणि प्रेमात सगळे माफ असे ब्रिदवाक्य ठरलेच आहे. याचीच प्रचिती शिरोळ तालुक्यात आली आहे. धरणगुत्ती ते जयसिंगपूर या अडीच किलोमीटर मार्गावर एका प्रेमवीराने ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ असे ऑईलपेंटने रस्त्यावरच रेखाटले आहे. आता हा प्रेमवीर कोण याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरु आहे. शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावात प्रेमाचा अगळा… Continue reading शिरोळ तालुक्यातील ‘हा’ प्रेमवीर कोण..?

शिरोळ तालुक्यातील २६५ पूरग्रस्तांना २ कोटी २५ लाखांचा मिळणार लाभ…

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : जुलै २०१९ मध्ये आलेल्या महापूरामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची रक्कम तर काहींना पीककर्ज माफी मिळाली होती. तर यामधील काही शेतकऱ्यांचे उशिरा झालेले पंचनामे आणि संबंधित बँकांच्या चुकीच्या माहितीमुळे शिरोळसह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते.   याबाबतचा विस्तृत अहवाल जिल्हा लेखापरीक्षण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने… Continue reading शिरोळ तालुक्यातील २६५ पूरग्रस्तांना २ कोटी २५ लाखांचा मिळणार लाभ…

गोकुळमध्ये महाडिक, पी एन विरोधात एकवटले सर्व ‘मातब्बर’ नेते…

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : कोल्हापुरात गोकुळ निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विरोधी आघाडीत बघता बघता तीन मंत्री, दोन खासदार, चार आमदार, दोन माजी आमदार आणि एक माजी खासदार एवढ्या मोठ्या प्रमाणात ताकत एकवटली आहे. यामुळे गोकुळच्या निवडणुकीत आता सत्ताधाऱ्यांची काय रणनीती असणार आहे हेच पहावे लागेल. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘आपलं ठरलय’ असा नारा दिला आणि… Continue reading गोकुळमध्ये महाडिक, पी एन विरोधात एकवटले सर्व ‘मातब्बर’ नेते…

गोकुळ बिनविरोधाची बोलणी फिस्कटण्यास आहेत ‘ही’ कारणे…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ आघाडी बरोबर चर्चा करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती. त्यानुसार मुंबई आणि कोल्हापुरात बैठकाही झाल्या. पण चर्चेदरम्यान दोन्हीकडून एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आणि सत्तारुढ आघाडीची विरोधकाना नगण्य जागा देऊन बोळवण करण्याची मानसिकता यामुळेच बिनविरोधाची बोलणी फिस्कटली, असे विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील… Continue reading गोकुळ बिनविरोधाची बोलणी फिस्कटण्यास आहेत ‘ही’ कारणे…

error: Content is protected !!