कसबा बावडा येथे मद्यधुंद पोलिसांची शहर पोलीस उपाधीक्षकांना धक्काबुक्की

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन मद्यधुंद पोलिसांनी शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी उपाधीक्षक यांचे अंगरक्षक प्रविण प्रल्हाद पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तिघाजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात आज (रविवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महामार्ग पोलीस… Continue reading कसबा बावडा येथे मद्यधुंद पोलिसांची शहर पोलीस उपाधीक्षकांना धक्काबुक्की

इचलकरंजीत तरुणावर प्राणघातक हल्ला : तरुण गंभीर

इचलकरंजी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजीमध्ये खून आणि प्राणघातक हल्ल्याचे सत्र सुरू आहे. गावभाग नदीवेस नाका परिसरात जामदार गल्ली येथे काल (शनिवार) रात्रीच्या सुमारास धनंजय नायकोडे (वय ३८, रा. चांदणी चौक) या तरूणावर पूर्व वैमनस्यातून अज्ञातांनी धारदार शस्त्राने  प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात धनंजय हा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी हल्लेखोर पसार झाले. धनंजयवर… Continue reading इचलकरंजीत तरुणावर प्राणघातक हल्ला : तरुण गंभीर

शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेला २ कोटींचा विक्रमी नफा : रविंद्र पंदारे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह बँकेने पारदर्शक  कारभाराद्वारे ठेवींचा चढता आलेख कायम ठेवला आहे. बँकेने सलग १० वर्षे शून्य टक्के एनपीए ठेवून सुमारे २ कोटी १ लाखांचा विक्रमी नफा मिळविलेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रविंद्र पंदारे यांनी दिली. बँकेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (शनिवार) ऑनलाईन पध्दतीने पार पडली. पंदारे… Continue reading शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेला २ कोटींचा विक्रमी नफा : रविंद्र पंदारे

इचलकरंजीवासियांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी : नगराध्यक्षांचे आवाहन

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चाललेला आहे. तो रोखावयाचा असेल तर सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्यासह प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांनी केले आहे. सौ. स्वामी आणि राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी चांदणी चौक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस… Continue reading इचलकरंजीवासियांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी : नगराध्यक्षांचे आवाहन

डिगे फौंडेशनतर्फे कोल्हापुरात ११ एप्रिलपासून ‘भीम फेस्टिव्हल…’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती व म. फुले यांची १९४ व्या जयंतीनिमित्त माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फौंडेशनच्या वतीने कोल्हापुरात ११ ते १४ एप्रिल या कालावधीत भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य प्रतिकृती, पुरस्कार, व्याख्यान, निबंध स्पर्धा, भोजनदान वंचितांचा भेटवस्तू देऊन सत्कार, संविधान माहिती असे कार्यक्रम होणार… Continue reading डिगे फौंडेशनतर्फे कोल्हापुरात ११ एप्रिलपासून ‘भीम फेस्टिव्हल…’

ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं..! : भाजपची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं !,  असा निशाणा भाजपने शिवसेनेवर साधला. भंडारा ते भांडुप… राज्यात सगळीकडेच रुग्णालयांना आगीचा धोका आहे. फक्त मुंबईपुरता… Continue reading ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं..! : भाजपची टीका

‘गोकुळ’साठी विरोधी आघाडीला स्थानिक राजकारण ठरत आहे ‘डोकेदुखी’

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जम्बो आघाडी केलीय. पण स्थानिक राजकारण यामध्ये अडचणीचे ठरत असल्याने आघाडीमध्ये फूट पडण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. त्यामुळे गोकुळ ताब्यात घेत असताना महाविकास आघाडीला स्थानिक राजकारणाचे तिढे सोडवूनच पुढे पाऊल टाकावे लागणार आहे. तर याचा फायदा सत्ताधारी गटाला जास्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोणत्याही… Continue reading ‘गोकुळ’साठी विरोधी आघाडीला स्थानिक राजकारण ठरत आहे ‘डोकेदुखी’

सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून रविवारपासून रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला सौम्य लक्षणे आढळली आहेत. … Continue reading सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण

आरक्षणांनी जनतेची दिशाभूल : गडहिंग्लजमध्ये ‘जनता दल’ विरोधात ‘राष्ट्रवादी’चा हल्लाबोल

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणे टाकणे आणि उठवण्याचे ‘ठराव’ करीत केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षा आणि सत्ताधारी ‘जनता दल’ करत आहेत. प्रत्यक्षात ‘त्या’ ठरावावर पुढे कोणतीही अंमलबजावणी होत नाही. खाटीक समाजाच्या हॉलचा ठरावही असाच असून त्या समाजाची मागणी अनेक वर्षांपासूनची असताना आणि साडेचार वर्षांपासून सत्तेत असून नगराध्यक्षांना आत्ताच त्याचा साक्षात्कार कुठून झाला?… Continue reading आरक्षणांनी जनतेची दिशाभूल : गडहिंग्लजमध्ये ‘जनता दल’ विरोधात ‘राष्ट्रवादी’चा हल्लाबोल

‘गोकुळ’साठी आ. आबिटकर गट कोणाकडे ..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी आता राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांनी येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना सांगितले. त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांच्याशी आमचे घनिष्ठ संबंध आहेत, पण… Continue reading ‘गोकुळ’साठी आ. आबिटकर गट कोणाकडे ..?

error: Content is protected !!