आरळगुंडीच्या पठारावर आणखी दोन बंधारे बांधणार : समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) :  सेनापती कापशी परिसरासाठी वरदान ठरणारे चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी  राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आरळगुंडी पठारावर आणखी दोन बंधारे बांधण्यात येणार आहेत. या बंधाऱ्या द्वारे हे पाणी चिकोत्रा धरणामध्ये वळविण्यात येईल, अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली. आरळगुंडी पठारावरील पावसाचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी… Continue reading आरळगुंडीच्या पठारावर आणखी दोन बंधारे बांधणार : समरजितसिंह घाटगे

शरद पवार यांच्यावर बुधवारी होणार शस्त्रक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी सायंकाळी अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या .  त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर ३१ मार्चरोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.   मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे… Continue reading शरद पवार यांच्यावर बुधवारी होणार शस्त्रक्रिया

सानेगुरुजी वसाहतीतील तरूणाचा नदीत बुडून मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्रांसोबत पोहताना हणमंतवाडी येथील घाटावर एक तरूण बुडला. त्याला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये नेले असता  त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. अथर्व विजय गायकवाड (वय २१, रा. सानेगुरुजी वसाहत) असे मृत तरुणाचे नांव आहे. या प्रकरणाची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अथर्व… Continue reading सानेगुरुजी वसाहतीतील तरूणाचा नदीत बुडून मृत्यू

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात ९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आज (रविवार) दिवसभरात ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १,४६७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कडेकोट बंदोबस्त…

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज (रविवार) होळी पौर्णिमेनिमित्त कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पौर्णिमेला या ठिकाणी गर्दी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नृसिंहवाडी देवस्थान कमिटीने शिरोळ पोलीस स्टेशन, होमगार्ड आणि वजीर रेस्क्यू फोर्सने याठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता. यावेळी गेल्या एक महिन्यापासून मंदिर परिसरात मास्क,… Continue reading कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कडेकोट बंदोबस्त…

…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा : मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल, तर येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत नियोजन करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे झालेल्या बैठकीत दिल्या.… Continue reading …तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा : मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

‘जय भवानी स्पोर्टस्’चा अभिनव उपक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत शिवाजी पेठ येथील जय भवानी स्पोर्ट्सने यंदा साधेपणाने होळी पौर्णिमा साजरी केली. यावेळी पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दान करण्यात आल्या. हा प्रतिसाद होळी पौर्णिमे पुरता न राहता ज्या-ज्या वेळी आपण स्मशानभूमीत दहन किंवा रक्षाविसर्जन करता जात असाल तर त्यावेळी दानपेटीत गुप्तदान करा, असे… Continue reading ‘जय भवानी स्पोर्टस्’चा अभिनव उपक्रम…

राज्यात खळबळ : शरद पवार, अमित शहा यांच्यामध्ये गुप्त बैठक..?

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त एका गुजराती वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्तानंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सचिन वाझे प्रकरण, पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप यामुळे राज्यातील ठाकरे सरकारची कोंडी झाली आहे. त्यातच हे… Continue reading राज्यात खळबळ : शरद पवार, अमित शहा यांच्यामध्ये गुप्त बैठक..?

गोकुळ निवडणूक : सत्यजितआबांच्या ‘घरवापसी’ची ‘ही’ आहेत कारणे…

कोल्हापूर (अविनाश सुतार) : जिल्ह्यात गोकुळ निवडणुकीची रंगत वाढू लागली असून नाट्यमय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. शाहूवाडीचे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर) यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत सत्ताधारी गटात घरवापसी केली. हा विरोधी गटाला धक्का मानला जात आहे. सत्यजित पाटलांचा महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय औटघटकेचा ठरला. यामागे कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची तीव्र नाराजी कारणीभूत… Continue reading गोकुळ निवडणूक : सत्यजितआबांच्या ‘घरवापसी’ची ‘ही’ आहेत कारणे…

होळीचे औचित्य साधत गरजू लोकांना पोळ्यांचे वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : होळीचे औचित्य साधून राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर शहरामधील विविध गरजू लोकांना पोळ्या वाटण्यात आल्या. तसेच एक घर एक पोळी दान स्वरूपात द्यावी, असे आवाहन जगताप यांनी केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून परिसरातील प्रत्येक घरामध्ये एक पोळी देण्यात आली.   कोल्हापूर शहरातील रेल्वे स्टेशन, सीबीएस स्टँड परिसर, भवानी… Continue reading होळीचे औचित्य साधत गरजू लोकांना पोळ्यांचे वाटप…

error: Content is protected !!