सर्व दुकाने चालू करण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत निदर्शने…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरसकट सर्व दुकाने चालू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी आज (गुरुवार) गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने गांधीनगर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. लॉकडाउन हटवा, व्यापाऱ्यांना वाचवा, असे विविध फलक घेऊन व्यापारी दुकानाच्या दारात घोषणा देत उभे होते. यावेळी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या एक तासाच्या कालावधीत… Continue reading सर्व दुकाने चालू करण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत निदर्शने…

दिगवडेतील ग्रामस्थांकडून पंचगंगा स्मशानभूमीसाठी पाच टन लाकूड, शेणी दान…

कोतोली (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील दिगवडे येथील ग्रामस्थांनी  कोल्हापूरातील पंचगंगा स्मशानभूमीला ५ टन लाकूड आणि ५ हजार शेणी दान केल्या. यावेळी लाकूड आणि शेणी भरलेले ट्रॅक्टर नुकतेच कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमी येथे पाठवण्यात आले आहेत. यावेळी सरदार खाडे, संदीप पवार, शिवाजी काळे, प्रदीप पाटील, रमेश जाधव, अभिजित पवार आदी उपस्थित होते.

शिवडाव, कोंडोशी परिसरात ‘टस्कर’मुळे उस, फणसाचे मोठे नुकसान : शेतकरी त्रस्त

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या शिवडाव, अंतुर्ली, कोंडोशी परिसरात टस्कर हत्तीने सलग दहा दिवसांपासून मुक्काम ठोकला असून कोंडोशी व शिवडाव येथील ऊस पिकाचे रात्री नुकसान करून दिवसा हा हत्ती जंगलात निघून जात आहे. कडगांव वनक्षेत्रपाल बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने शेतकऱ्यांची नुकसानभरपाई व हत्तीचे संरक्षण अशी दुहेरी यंत्रणा उभी केली आहे. गावोगावी गस्त घालण्याचे… Continue reading शिवडाव, कोंडोशी परिसरात ‘टस्कर’मुळे उस, फणसाचे मोठे नुकसान : शेतकरी त्रस्त

महे येथे रानटी प्राण्यांकडून बकऱ्यांचा फडशा : दीड लाखांचे नुकसान

मुरगूड (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील महे येथील कृष्णात भागोजी पुजारी या मेंढपाळाच्या २० कोकरांचा  रानटी प्राण्यांनी फडशा पाडला. यामध्ये या गरीब मेंढपाळाचे सुमारे दीड लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. याच तालुक्यातील सावरवाडी, खुपिरे व कांडगाव पाठोपाठ या आठवड्यातील ही चौथी घटना असल्याने धनगर समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महे येथील नवाळे मळा नावाच्या शेतीमध्ये… Continue reading महे येथे रानटी प्राण्यांकडून बकऱ्यांचा फडशा : दीड लाखांचे नुकसान

सरवडेत मंडल कृषी कार्यालयाला मंजुरी : ३८ गावांना होणार लाभ

सरवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे कृषी मंडल कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दुधगंगेच्या काठावरील ३८ गावांना याचा लाभ होणार आहे. कृषी कार्यालयीन कामासाठी राधानगरी येथे नागरिकांना जावे लागत होते. मात्र, या कार्यालयाला मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. राधानगरी येथे तालुका कृषी कार्यालय आहे. येथेच राधानगरी आणि दुधगंगा काठावरील गावांच्यासाठी हे मंडळ… Continue reading सरवडेत मंडल कृषी कार्यालयाला मंजुरी : ३८ गावांना होणार लाभ

‘गोकुळ’च्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करू : खा. शरद पवार  

मुंबई (प्रतिनिधी) : नव्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ आणखी बहरत जावो, संघ अजून मला बहरलेला पहायचा आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या उन्नतीचे नवनवीन पाऊल संघाने टाकावे अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच पुढील काळात संघास मार्गदर्शनाची गरज लागल्यास सर्वतोपरी मदत करु, असे आश्‍वासन दिले. संघाचे चेअरमन विश्वास पाटील आणि नूतन संचालकांनी पवार यांची आज (बुधवार)… Continue reading ‘गोकुळ’च्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करू : खा. शरद पवार  

कोल्हापूर विमानतळासाठी ६४ एकर भूसंपादनासाठी उद्यापासून मोजणी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळासाठी अतिरिक्त ६४ एकर जमीन संपादन करण्यासाठी गुरुवारपासून गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील जमिनीची मोजणी होणार असून ती शनिवार (ता. १२) अखेर होणार आहे. उपअधीक्षक भूमिअभिलेख करवीर यांच्या उपस्थितीमध्ये जमिनीची मोजणी होणार आहे. याबाबत  जमीन मोजणीच्या पंधराशेहून अधिक खातेदारांच्या नोटिसा तलाठी कार्यालय मुडशिंगी येथे प्राप्त झाल्या. २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९१,… Continue reading कोल्हापूर विमानतळासाठी ६४ एकर भूसंपादनासाठी उद्यापासून मोजणी…

‘ही’ तर मराठा समाजाची दिशाभूल : चंद्रकांतदादांची राज्य सरकारवर टीका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा समाज मागास असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळविण्यापूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणासाठी मागणी करणे, हा मराठा समाजाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (बुधवार) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. कोरोनाची बंधने संपल्यावर लोक कसा प्रक्षोभ व्यक्त करतात… Continue reading ‘ही’ तर मराठा समाजाची दिशाभूल : चंद्रकांतदादांची राज्य सरकारवर टीका

जिल्ह्यात दिवसभरात १,७२८ जण कोरोनामुक्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,५१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) दिवसभरात १,७२८ जण कोरोनामुक्त झाले असून ६,८६० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४०७, आजरा तालुक्यातील ५३, भुदरगड तालुक्यातील ३५, चंदगड तालुक्यातील ३०, गडहिंग्लज तालुक्यातील ५१, गगनबावडा तालुक्यातील… Continue reading जिल्ह्यात दिवसभरात १,७२८ जण कोरोनामुक्त…

शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’कडे ‘या’ विषयी मागितली महत्त्वपूर्ण माहिती…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या गोकुळच्या टॅंकरच्या बिलावरून पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर त्याला गोकुळच्या संचालक सौ. शौमिका महाडिक यांनी थेट  प्रत्युत्तर देऊन टँकरच्या माध्यमातून चुकीचे काही झाले असेल तर गुन्हे दाखल करावेत असे आव्हान दिले. त्याबरोबरच त्यांनी आज (बुधवार) ‘गोकुळ’मधील दूध वाहतुकीच्या भाड्याबाबत मागील दहा वर्षांतील सविस्तर माहिती संघाच्या कार्यकारी संचालकांकडे… Continue reading शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’कडे ‘या’ विषयी मागितली महत्त्वपूर्ण माहिती…

error: Content is protected !!