कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,५१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) दिवसभरात १,७२८ जण कोरोनामुक्त झाले असून ६,८६० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४०७, आजरा तालुक्यातील ५३, भुदरगड तालुक्यातील ३५, चंदगड तालुक्यातील ३०, गडहिंग्लज तालुक्यातील ५१, गगनबावडा तालुक्यातील ७, हातकणंगले तालुक्यातील १७९, कागल तालुक्यातील ४०, करवीर तालुक्यातील ३३९, पन्हाळा तालुक्यातील १०, राधानगरी तालुक्यातील ३३, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील ५२, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १५३ आणि इतर जिल्ह्यातील ३६ अशा १,५१९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – १,२६,७९३.

डिस्चार्ज – १,१०,२३६.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १२,५२८.

मृत्यू – ४,०२९.