जिल्ह्यात १,४३३ जण कोरोनामुक्त : रुग्णांच्या संख्येतही घट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज (मंगळवार) काहीशी घट झाली आहे. चोवीस तासात एकूण १,०९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १,४३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २९२, आजरा- ४४, भुदरगड- ४६, चंदगड- १८, गडहिंग्लज- २१, गगनबावडा- १, हातकणंगले-११४, कागल-… Continue reading जिल्ह्यात १,४३३ जण कोरोनामुक्त : रुग्णांच्या संख्येतही घट

काँग्रेसचे पत्रक म्हणजे पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेची मूक कबुलीच : भाजपची टीका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, किंबहुना कोल्हापुरातील कोरोनाच्या उद्रेकास सर्वस्वी तेच जबाबदार आहेत हे जनतेला कळून चुकले आहे. काँग्रेसने पत्रकाद्वारे भाजपावर जे आरोप केले आहेत ते पाहता त्यांनीही मूकपणे पालकमंत्र्यांची निष्क्रियता मान्य केली आहे असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत भाजपने ना. सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. भाजपच्या… Continue reading काँग्रेसचे पत्रक म्हणजे पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेची मूक कबुलीच : भाजपची टीका

महापालिकेने उतरवली धोकादायक इमारत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतीबाबत जाहीर प्रकटन करण्यात आले होते. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (मंगळवार) बिंदू चौक सब जेलसमोर असलेल्या आझाद गल्लीतील जामदार वाड्याची धोकादायक इमारत जेसीबीच्या साहाय्याने उतरवण्यात आली. ही इमारत राजेंद्र जामदार यांच्या मालकीची… Continue reading महापालिकेने उतरवली धोकादायक इमारत…

उद्यापासून बोरपाडळे गावात सहा दिवसांचा लॉकडाऊन…

बोरपाडळे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथे उद्या (बुधवार) पासून सहा दिवसांचा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. यामध्ये दूधसंस्था, शेतीच्या बियाणांची दुकाने, औषधांची दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच शरद जाधव यांनी दिली. बोरपाडळे गावात आजअखेर ७३ कोरोना रुग्ण… Continue reading उद्यापासून बोरपाडळे गावात सहा दिवसांचा लॉकडाऊन…

मराठा आरक्षणाच्या मूकमोर्चात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी…

मुंबई (प्रतिनिधी) :  खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृ्त्वात उद्या (बुधवार) मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे.  महाराष्ट्रातील हा पहिलाच मराठा मोर्चा आहे. या मोर्चाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्या होणाऱ्या या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विट करुन दिली आहे. काहीच दिवसांपूर्वीच खा. संभाजीराजे… Continue reading मराठा आरक्षणाच्या मूकमोर्चात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी…

अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत…

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रनौत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर आरोप करणं तर कधी देशातील घडामोडींवर खळबळजनक वक्तव्य करणं. यामुळे कंगना अनेकदा अडचणीत सापडली आहे. आता पुन्हा एकदा कंगनाला आलेल्या एका अडचणीमुळे कोर्टात धाव घ्यावी लागली. मात्र, कोर्टाने तिला दिलासा दिला नाही.   पासपोर्ट प्राधिकरणानं कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरणास… Continue reading अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत…

कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

टोप (प्रतिनिधी) : फाउंड्री उद्योगाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक आणि झंवर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रामप्रताप झंवर यांचे आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. रामप्रताप झंवर यांचा जन्म इचलकरंजी येथे त्यांच्या आजोळी ३ फेब्रुवारी १९३५ ला झाला. आष्टा (जि. सांगली) हे त्यांचे… Continue reading कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट : १,५६८ जणांना डिस्चार्ज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज (सोमवार) काहीशी घट झाली आहे. चोवीस तासात एकूण १,१८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १,५६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ३४०, आजरा- ४२, भुदरगड- ३३, चंदगड- १५, गडहिंग्लज- २१, गगनबावडा- ६, हातकणंगले-१२६, कागल-… Continue reading जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट : १,५६८ जणांना डिस्चार्ज…

गांधीनगर बाजारपेठेत गर्दीने उडवला लॉकडाउनचा फज्जा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असताना गांधीनगर बाजारपेठेत मात्र आज (सोमवार) ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊनचा फज्जा उडाला होता. तशीच पुनरावृत्ती सोमवारी दिसून आली. एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत; पण कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णांची व मृतांची संख्या वाढत आहे. याबाबत जनतेने… Continue reading गांधीनगर बाजारपेठेत गर्दीने उडवला लॉकडाउनचा फज्जा…

दुग्‍धव्‍यवसाय विकासासाठी बल्‍क कुलर ही काळाची गरज : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था उद्योगधंदे आर्थिक मंदीत असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने सुरु आहे. दुग्‍धव्‍यवसाय विकासासाठी बल्‍क कुलर ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आरोग्‍य राज्‍यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी केले. आनंद एम सहकारी दूध संस्‍था मर्या., कवठेसार (ता. शिरोळ) येथे गोकुळच्या बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटनप्रसंगी… Continue reading दुग्‍धव्‍यवसाय विकासासाठी बल्‍क कुलर ही काळाची गरज : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

error: Content is protected !!