अंबाबाई मंदिरात धारदार हत्यार घेऊन तरूणाचा प्रवेश : पोलिसांची सतर्कता  

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ‘ई पास’ बंधनकारक असताना पास न काढता बेकायदेशीरित्या विनापरवाना कट्यार सारखे धारदार हत्यार जवळ बाळगून मंदिरात प्रवेश करणाऱ्यास एका तरूणास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अरुण अशोक घोलपे (वय ३४ रा. वेताळ पेठ, गल्ली नं ३, इचलकरंजी) याला अटक करून  त्याच्याकडील  धारदार  शस्त्र जप्त केले. कोरोनाच्या… Continue reading अंबाबाई मंदिरात धारदार हत्यार घेऊन तरूणाचा प्रवेश : पोलिसांची सतर्कता  

टोप, संभापुर, कासारवाडीत महाराष्ट्र बंदला अत्यल्प प्रतिसाद…

टोप (प्रतिनिधी) :  उत्तरप्रदेशमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. परंतु, टोप, संभापुर, कासारवाडी गावामध्ये कोणत्याही प्रकारचा बंद पाळण्यात आला नाही. तसेच अंबप फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेस पक्षातर्फे रास्तारोको करण्यात आला.

शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत दांडियाचे आयोजन : शंभर जणांवर गुन्हा नोंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर गरबा-दांडिया खेळल्याप्रकरणी शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाच्या विश्वद्वीप संजय (रा. नागाळा पार्क), सिद्धेश मंगेश पाटील, सुजित वाईगडे, राकेश साळुंखे, दिग्विजय कोंडरे, अमोल चव्हाण यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी आहे. मात्र शिवाजी पेठेतील… Continue reading शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत दांडियाचे आयोजन : शंभर जणांवर गुन्हा नोंद

कळंबा येथे तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : बारा जणांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात कळंबा परिसरातील पावरग्रीडकडे जाणाऱ्या रोडवर उन्ने फार्महाऊस नजीक सुरू असलेल्या बेकायदेशीर तीन पानी जुगार अड्यावर करवीर पोलिसांनी काल (रविवार) रात्री उशीरा छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. तर अड्डा मालक दिंगबर पाटील यांच्यासह १३ जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद… Continue reading कळंबा येथे तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : बारा जणांना अटक

कळे येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फुर्द प्रतिसाद…

कळे (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथील झालेल्या प्रकाराबाबत शेतकरी आणि महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठेतील भगवा चौक येथे पन्हाळा तालुका शिवसेनेच्या वतीने  केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवून उत्स्फूर्दपणे पाठिंबा दिला. यावेळी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि… Continue reading कळे येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फुर्द प्रतिसाद…

विरोधकांनी ‘राजाराम’वर बोलणे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली’..! : दिलीप उलपे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर सभासद खुश आहेत. कारखान्याकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजना आणि अनुदानांचे लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ही वाढती संख्या म्हणजेच कारखान्यावर आणि पर्यायाने व्यवस्थापनावरचा सभासदांचा वाढता विश्वास आहे. त्यामुळे विरोधी आघाडीला समोरची निवडणूक अवघड वाटत असलेने त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे. असे पत्रक… Continue reading विरोधकांनी ‘राजाराम’वर बोलणे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली’..! : दिलीप उलपे

महाराष्ट्र बंदला हुपरी परिसरात संमिश्र प्रतिसाद…

रांगोळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र बंदला हुपरी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन आपला सहभाग नोंदविला. मात्र, दुपारनंतर सर्व व्यवसाय सुरळित सूरू करण्यात आले. मात्र, रेंदाळ, रांगोळी, यळगुड, जंगमवाडीमध्ये बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. तिथले सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, कम्युनिस्ट पार्टी, वंचित… Continue reading महाराष्ट्र बंदला हुपरी परिसरात संमिश्र प्रतिसाद…

दिलासादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ‘दहा’च्या आत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ चा मृत्यू झाला असून ४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४, आजरा – ०, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – ०, गगनबावडा – ०, हातकणंगले – १, कागल – ०, … Continue reading दिलासादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ‘दहा’च्या आत…

महाराष्ट्र बंदला हातकणंगले परिसरात चांगला प्रतिसाद…

टोप (प्रतिनीधी) : उत्तरप्रदेश येथील लखीमपूरमधे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले परीसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. हातकणंगले, आळते, कुंभोज, अतीग्रे, सावर्डे, मजले, नरंदे, नेज गावातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदवला. यामधून अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली होती. नेहमीच… Continue reading महाराष्ट्र बंदला हातकणंगले परिसरात चांगला प्रतिसाद…

महाराष्ट्र बंदला कोतोलीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद…

कोतोली (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने शेतकरी आंदोलनात गाडी घालून हिंसाचार घडवून आणला होता. या घटनेमुळे देशभरात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे सर्व व्यापाऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दिला. यावेळी शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख… Continue reading महाराष्ट्र बंदला कोतोलीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद…

error: Content is protected !!