पुणेकर डॉक्टरचा कॅलिफॉर्नियामध्ये विमान अपघातात मृत्यू

पुणे (प्रतिनिधी) : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आज एका डबल इंजिन विमानाला अपघात होऊन ते कोसळले. भारतीय वंशाच्या सुरिझोना येथील युमा रिजनल मेडिकल सेंटरमध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉ. सुगाता दास यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला. यावेळी दास हे विमान चालवत होते की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सँटी येथील सँटाना हायस्कूलजवळ झालेल्या अपघातामुळे… Continue reading पुणेकर डॉक्टरचा कॅलिफॉर्नियामध्ये विमान अपघातात मृत्यू

लस मोफत दिल्याने इंधनाचे दर वाढवले : पेट्रोलियम राज्यमंत्र्यांचा अजब दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिनरल वॉटरपेक्षा पेट्रोलचे दर कमी आहेत. परंतु राज्य सरकारने लावलेल्या करांमुळेच पेट्रोलचे दर वाढले आहेत. तसेच देशभरात कोरोना लस मोफत दिल्याने इंधनाचे दर वाढवले आहेत, असा अजब दावा पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केला आहे. या दाव्यामुळे तेली यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली… Continue reading लस मोफत दिल्याने इंधनाचे दर वाढवले : पेट्रोलियम राज्यमंत्र्यांचा अजब दावा

सहाव्या दिवशी अंबाबाईची इंद्राणी मातृका रूपातील महापूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी आज (मंगळवार) करवीर निवासनी श्री अंबाबाईची ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराहीच इंद्राणी चामुंडा सप्तमातरा स्वरुपातील सालंकृत महापूजा साकारण्यात आली. ही पूजा श्रीपूजक सुकृत मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि विद्याधर मुनिश्वर यांनी बांधली. इंद्राणी मातृका ही देवांचा राजा इंद्र यांची शक्ती आहे. हिला ऐंद्री, महेंद्री किंवा वज्री असेही… Continue reading सहाव्या दिवशी अंबाबाईची इंद्राणी मातृका रूपातील महापूजा

…म्हणून मला असं वाटतंय, आजही मीच मुख्यमंत्री आहे : देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई (प्रतिनिधी) : तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवला नाही, की मी मुख्यमंत्री नाही, मला असं वाटतंय की मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कोणत्या पदावर आहे, ते महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त… Continue reading …म्हणून मला असं वाटतंय, आजही मीच मुख्यमंत्री आहे : देवेंद्र फडणवीस

जागतिक संधिवात दिवस : लक्षणे, कारणे, उपाय   

मुंबई (प्रतिनिधी) : वयाच्या साठीनंतर होणारा संधिवात हा आजार आता प्रामुख्याने तिशी- पस्तीशीतील तरूणाईमध्ये दिसून येत आहे. पाठ दुखणे, हाडे दुखणे, आमवात अशा विविध कारणांनी तरूण मुले – मुली सध्या त्रस्त आहेत. तसेच थंडीच्या काळात अनेक लोकांना संधिवाताचा त्रास असहाय होत असल्याचे जाणवतो. लठ्ठ असणाऱ्या लोकांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. हाय हिल्स घातल्याने पायाची… Continue reading जागतिक संधिवात दिवस : लक्षणे, कारणे, उपाय   

दर्शनासाठी जाताना साताऱ्यातील बाईक रायडर महिलेचा टँकर डोक्यावरून गेल्याने मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी बाईकवरून निघालेल्या बाईक रायडर महिलेचा टँकर डोक्यावरुन गेल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात भोकर फाटा, दाभड (जि. नांदेड) येथे आज (मंगळवार) सकाळी झाला. शुभांगी संभाजी पवार (वय ३२, रा. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नांव आहे. साताऱ्यातील हिरकणी ग्रुपच्या महिला राईडर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी… Continue reading दर्शनासाठी जाताना साताऱ्यातील बाईक रायडर महिलेचा टँकर डोक्यावरून गेल्याने मृत्यू

आता लवकरच लहान मुलांना लस

मुंबई (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या औषध नियंत्रक मंडळाने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लहान मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोव्हॅक्सिन ही देशातील पहिली लस आहे, जी मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली आहे. आता केंद्र सरकारकडून २ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी… Continue reading आता लवकरच लहान मुलांना लस

समीर वानखेडेंच्या पाळत ठेवल्याच्या आरोपावर गृहमंत्र्यांचा ‘मोठा’ खुलासा

मुंबई (प्रतिनिधी) : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांनी याबाबतची  तक्रार पोलीस महासंचालकांकडे केली आहे. आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   वळसे- पाटील म्हणाले की, मला वाटत नाही, की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे.… Continue reading समीर वानखेडेंच्या पाळत ठेवल्याच्या आरोपावर गृहमंत्र्यांचा ‘मोठा’ खुलासा

इंधन दरवाढीबरोबर आता नागरिकांना वीज दरवाढीचा झटका ?

मुंबई (प्रतिनिधी) : इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता सणासुदीच्या काळात वाढीव वीज दराचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. विजेच्या दरात ७.२५ वरून १२ रूपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर खासगी कंपन्यांकडील कोळसाचा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने खुल्या बाजारातून वीज खरेदीचा विचार सुरू केला आहे. परिणामी ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा… Continue reading इंधन दरवाढीबरोबर आता नागरिकांना वीज दरवाढीचा झटका ?

दिल्लीत मोठा घातपाताचा दहशतवादी कट उधळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नागरिक असल्याचे बनावट ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला  लक्ष्मीनगरमधील रमेश पार्कमधून अटक करण्यात आली. ही कारवाई  दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने करत सणासुदीच्या काळात दहशतवाद्यांचा घातपात करण्याचा कट  उधळून लावला आहे.   मोहम्मद असरफ असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा आहे. या दहशतवाद्याकडून एक एके -४७ रायफल,… Continue reading दिल्लीत मोठा घातपाताचा दहशतवादी कट उधळला

error: Content is protected !!