आजच्या आठव्या दिवशी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनीच्या स्वरुपात पुजा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या आजच्या आठव्या दिवशी श्री अंबामातेची महिषासुरमर्दिनीच्या स्वरुपात आकर्षक पुजा बांधण्यात आली. दैत्य रंभासुर व महिषी यांच्या मिलनातून महिषासुराचा जन्म झाला होता. तो ब्रम्हाचा भक्त होता. घोर तपश्चर्येतुन त्याने ब्रम्हदेवाकडून मानव, देव, दानव यांच्याकडून अपराजित राहण्याचे वरदान मिळवले होते. या वरदानाने तो उन्मत्त झाला होता. महिषासुराने देवदेवतांना हैराण करुन सोडले होते. त्याच्या… Continue reading आजच्या आठव्या दिवशी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनीच्या स्वरुपात पुजा…

राशिवडे परिसरात आरोग्य विभागाची ‘लस आपल्या दारी’ अभियान…

राशिवडे (प्रतिनिधी) : आरोग्य विभागामार्फत लस आपल्या दारी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. राशिवडे परिसरात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी घर टू घर सर्व्हे करून ज्यांनी लस घेतली नाही अशा नागरिकांचे प्रबोधन करून लसीकरणाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काही नागरीक चुकीच्या माहितीमुळे लसीकरणापासून बाजूला होताना दिसत आहेत. त्यांना… Continue reading राशिवडे परिसरात आरोग्य विभागाची ‘लस आपल्या दारी’ अभियान…

केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना घराघरात पोहचवणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत. त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत शाहू ग्रुपच्या माध्यमातून कशा पोहोचतील. त्या प्रभावीपणे कशा राबविता येतील, यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतल्याचे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. या चर्चेमध्ये, किसान क्रेडिट कार्डद्वारे… Continue reading केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना घराघरात पोहचवणार : समरजितसिंह घाटगे

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ३० जून रोजी दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रुपये ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदान वितरीत करण्यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन असणार असून ती साधारणपणे येत्या दोन आठवड्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला कळविली जाणार आहे.… Continue reading कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान…

राजारामपुरीमध्ये दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात राजारामपुरीमध्ये ११ व्या गल्लीत तवणाप्पा पाटणे हायस्कूल रोडवर एका तीन मजली अर्पाटमेंटच्या दुसऱ्या   मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली. शोभा कांबळे (वय ४०, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रवी गोविंद कांबळे (वय २४, रा. कनानगर), सुहास भगवान पवार… Continue reading राजारामपुरीमध्ये दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू…

…अन्यथा तिव्र आंदोलन : शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे शिवप्रेमींचे प्रेरणास्थान आहेत. अशा पवित्र किल्ल्यांची नावे काही बार आणि वाईनशॉपला दिली आहेत. अशा गडकिल्ल्यांची नावे ज्याज्या बार आणि वाईन शॉपला दिली आहेत ती त्वरित बदलावीत. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच यापुढे अशी नावे असलेल्या परमिट रूम आणि वाईन शॉपला परवानगी देऊ नये. शिवदुर्ग संवर्धन आंदोलन… Continue reading …अन्यथा तिव्र आंदोलन : शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटना

‘एमपीएससी’ परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवा : मराठा महासंघ 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यसेवा २०२१ पूर्व परीक्षेच्या जाहिरातींमध्ये सर्वसाधारण वर्गासाठी वयोमर्यादा ३८ छापून आली आहे. परंतु पावसाळी अधिवेशनात ठराव करुन ही वयोमर्यादा ४३ केली आहे. यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन देऊन ही वयोमर्यादा वाढवण्यात यावी व पुन्हा जाहिरात प्रसिध्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष… Continue reading ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवा : मराठा महासंघ 

कोल्हापुरात शनिवारी ‘वुमन्स डॉक्टर विंग आयएमए ईव्ह कॉन’ राज्यस्तरीय परिषद 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडेकर यांनी ‘वुमन्स डॉक्टर विंग’ ही संकल्पना आणली. या विंगची ११ वी राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद शनिवारी (दि.१६) कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. “वुमन टुडे अँड टूमारो” अशी संकल्पना या परिषदेची असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वुमन्स डॉक्टर विंगच्या… Continue reading कोल्हापुरात शनिवारी ‘वुमन्स डॉक्टर विंग आयएमए ईव्ह कॉन’ राज्यस्तरीय परिषद 

कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवा : ना. शंभूराज देसाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सुरक्षेची पाहणी केली. पोलीस विभागाने यापुढील काळात ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार, सचिव शिवराज नाईकवाडी, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण व अन्य… Continue reading कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवा : ना. शंभूराज देसाई

‘गोकुळ’ दूध संस्थांच्या खात्यावर ८३.८१ कोटी जमा करणार : विश्वास पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर १४ ऑक्टोबररोजी जमा करणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस दूध दर फरक दिला जातो. यावर्षी संघाने म्हैस दुधाकरीता… Continue reading ‘गोकुळ’ दूध संस्थांच्या खात्यावर ८३.८१ कोटी जमा करणार : विश्वास पाटील

error: Content is protected !!