हिंमत असेल, तर ईडीने माझ्याकडे… :  खा. उदयनराजे

सातारा (प्रतिनिधी) : हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,  असे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं,  असे म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. जसं आपण पेरतो, तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे… Continue reading हिंमत असेल, तर ईडीने माझ्याकडे… :  खा. उदयनराजे

आता विकासकामे होणार : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ

मुंबई  (प्रतिनिधी) :  कमी  निधी मिळत असल्याने विकासकामे करता येत नसल्याची तक्रार आता आमदारांना करता येणार नाही. कारण राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत १ कोटी रूपयांची वाढ करण्याचा  महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा  आमदारांबरोबर विधानपरिषदेच्या आमदारांच्या निधीत ही वाढ करण्यात येणार आहे. सध्या आमदारांना ३ कोटी रुपये  विकासनिधी  मिळतो. परंतु, मतदारसंघाची भौगोलिक रचना… Continue reading आता विकासकामे होणार : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ

रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको : चित्रा वाघ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात रिक्त असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नांव निश्चित झाले आहे. यावरून भाजपच्या  उपाध्यक्ष  चित्रा वाघ यांनी ट्विट  करत चाकणकर यांच्यावर नांव न घेता निशाणा साधला आहे. आता यावरून वाघ आणि चाकणकर यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. वाघ यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,… Continue reading रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको : चित्रा वाघ

जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी आयफेल टॉवरवर जाऊन मुलीला…: पवारांच्या ‘त्या’ विधानावर हास्यकल्लोळ    

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाविषयी एका किस्सा सांगून पत्रकार परिषदेतील वातावरण खुलविले. तर किस्सा ऐकून  उपस्थित पत्रकार  हास्यकल्लोळात बुडाले. शरद पवार यांनी सांगितले की, आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टिकोन किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी मंगळवारी  संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल… Continue reading जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी आयफेल टॉवरवर जाऊन मुलीला…: पवारांच्या ‘त्या’ विधानावर हास्यकल्लोळ    

सरकारने बांधकाम कामगारांचा अंत पाहू नये : भरमा कांबळे

राशिवडे (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील लालबावटा बांधकाम कामगार संघटनेने संघर्ष करून २४ प्रकारच्या योजना पदरात पाडून घेतल्या आहेत.  संघटना आपल्या मागे लागण्याची वाट पाहू नका.  कामगारांचा अंत पाहू नका, आमच्या मागण्यांची वेळीच दखल घ्या,  असे आवाहन लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केले. ते आवळी बुद्रुक येथे  झालेल्या बांधकाम कामगारांच्या… Continue reading सरकारने बांधकाम कामगारांचा अंत पाहू नये : भरमा कांबळे

आदमापूर येथे टँकरच्या चाकाखाली सापङून एकाचा मृत्यू…

गारगोटी (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामाच्या दर्शनासाठी जात आसताना टँकरच्या चाकाखाली सापङून एकाचा मृत्यू झाला आहे. पांङूरंग गणपती ङेकळे (वय ५७, रा. मजरे कासारवाङा, ता. राधानगरी, सध्या रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद भूदरगड पोलिसांमध्ये झाली आहे. पांडूरंग डेकळे हे आपल्या मोटर सायकल क्र. एमएच ०९… Continue reading आदमापूर येथे टँकरच्या चाकाखाली सापङून एकाचा मृत्यू…

‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या निवृती निमित्त सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर निवृत झाले. त्या निमित्य कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कॉ. जाहिर निकम, सदलगेकर, कॉ. एस. बी. पाटील, कॉ. शंकर पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाला. डी. व्ही. घाणेकर म्हणाले की, गेली सत्तेचाळीस वर्षे डेअरी व्यवसायामध्ये काम… Continue reading ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या निवृती निमित्त सत्कार…

…अन्यथा कारखान्याच्या गेटमधून एकही वाहन सोडणार नाही : शेतकरी संघटना

 कोतोली (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांची शेअर्स रक्कम व्याजासह परत मिळावी. चालू हंगामात उसाला प्रति टन चार हजार रुपये दर मिळावा यासाठी आज (बुधवार) दालमिया शुगर कारखान्याला शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. जर तोडगा नाही निघाला तर कारखान्यांमध्ये उसाचे कांड येऊ देणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील दत्त आसुर्ले पोर्ले साखर कारखाना… Continue reading …अन्यथा कारखान्याच्या गेटमधून एकही वाहन सोडणार नाही : शेतकरी संघटना

अवंतीपोरामध्ये जैशचा कमांडर शाम सोफीला कंठस्नान…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  जम्मू -काश्मीरमध्ये, सुरक्षा दलांना आज (बुधवार) एका मोठ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात मोठे यश मिळाले आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्रालमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैशचा कमांडर शाम सोफीला ठार केले. याला आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी दुजोरा दिला आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले,  दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्राल भागातील तिलवानी… Continue reading अवंतीपोरामध्ये जैशचा कमांडर शाम सोफीला कंठस्नान…

महिला फुटबॉल खेळाडूंना कोल्हापूर सिटी हक्काचे व्यासपीठ : मधुरिमाराजे छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिला फुटबॉल खेळाडूंना फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी हक्काचे व्यासपीठ आहे. असे मत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. त्या फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटीच्या सिनिअर महिला संघाच्या निवड चाचणी, सराव शिबीराच्या उद्घाटनावेळी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चंद्रकांत जाधव… Continue reading महिला फुटबॉल खेळाडूंना कोल्हापूर सिटी हक्काचे व्यासपीठ : मधुरिमाराजे छत्रपती

error: Content is protected !!