विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला धक्का : मोठा नेता काँग्रेसमध्ये  

नागपूर (प्रतिनिधी) : नागपुरात विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी आज (सोमवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. भोयर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आरएसएसचे स्वयंसेवक राहिलेले नगरसेवक छोटू भोयर मंगळवारी स्थानिक… Continue reading विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला धक्का : मोठा नेता काँग्रेसमध्ये  

इस्लामपूर येथे मैत्रिणीबरोबर शरीरसंबंधास नकार देणाऱ्या तरूणावर पोलिसाकडून अनैसर्गिक अत्याचार  

इस्लामपूर (प्रतिनिधी) : मैत्रिणीबरोबर शरीरसंबंध करून देण्यास नकार देणाऱ्या तरूणाकडून खंडणी उकळून त्याच्यावरच पोलीस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील हणमंत कृष्णा देवकर (वय ३४, रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) या पोलीस कर्मचाऱ्याला अटक कऱण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरूण इस्लामपूर शहरात उच्च महाविद्यालयीन… Continue reading इस्लामपूर येथे मैत्रिणीबरोबर शरीरसंबंधास नकार देणाऱ्या तरूणावर पोलिसाकडून अनैसर्गिक अत्याचार  

एसटी संपाबाबत अजित पवार, अनिल परब, शरद पवार यांच्यामध्ये खलबते

मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज (सोमवार) नेहरू सेंटर येथे महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून संपावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.   एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी लावून धरल्याने संपाची तीव्रता वाढली… Continue reading एसटी संपाबाबत अजित पवार, अनिल परब, शरद पवार यांच्यामध्ये खलबते

…’त्या’ विद्यार्थ्यांची ‘टीईटी’ परीक्षा पुन्हा घ्या : युवासेना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टीईटी परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी (दि.२१) झालेल्या  टीईटी परीक्षेला केवळ २ मिनिटे उशीर झाला म्हणून परीक्षार्थींना प्रवेश दिला नाही.  त्यामुळे शहरातील अनेक  महाविद्यालयावर  गोंधळाचे वातावरण तयार झाले… Continue reading …’त्या’ विद्यार्थ्यांची ‘टीईटी’ परीक्षा पुन्हा घ्या : युवासेना

विधान परिषद निवडणूक : प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड शक्य  

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव  यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार संजय केणेकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. आ.शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी प्रज्ञा सातव… Continue reading विधान परिषद निवडणूक : प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड शक्य  

ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसली : अनेक जण चिरडले

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घूसून झालेल्या अपघातात अनेकांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही धक्कादायक घटना अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमध्ये घडली. या भयंकर घटनेचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विस्कॉन्सिनच्या वौकेशा शहरात ख्रिसमस परेड सुरू  असताना  एक लाल रंगाची स्पोर्टस कार अंदाधुंद पद्धतीने गर्दीला चिरडून जाताना दिसत आहे. या घटनेतील मृतांचा… Continue reading ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसली : अनेक जण चिरडले

गडहिंग्लजकरांचे फुटबॉल प्रेम कौतुकास्पद : ना. हसन मुश्रीफ    

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजकरांचे फुटबॉलवरील प्रेम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. विनर्स एफसीने इतक्या मोठ्या पद्धतीने स्पर्धा घेतली आहे. तसेच आपण गडहिंग्लज फुटबॉलसाठी आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. तर गडहिंग्लजकरांचे फुटबॉलवर असलेले प्रेम हे समोर असलेल्या प्रेक्षकांवरुन दर्शवत असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले.    गडहिंग्लजमध्ये विनर्स एफसीने फुटबॉल स्पर्धा-… Continue reading गडहिंग्लजकरांचे फुटबॉल प्रेम कौतुकास्पद : ना. हसन मुश्रीफ    

विधान परिषदेसाठी अमल महाडिक उद्या अर्ज दाखल करणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपाचे विधान परिषदेचे उमेदवार माजी आ. अमल महाडिक हे उद्या (सोमवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिली आहे. यावेळी अमल महाडिक हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ. प्रकाश आवाडे, आ. विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  

दिड कोटींचा गंडा घालणारा ‘डिजे’ अखेर पोलीसांच्या जाळ्यात…

टोप (प्रतिनिधी) : हालोंडी आणि हेर्लेसह परिसरातील लोकांना कमी किंमतीत सोने देतो, असे सांगून सुमारे दिड कोटींचा गंडा घालणाऱ्या हालोंडीच्या दत्तात्रय मारुती जामदार उर्फ डीजेला चेकबाऊन्स प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी काल (शनिवार) अटक केली. या प्रकरणात तक्रारदार पुढे आल्याने आता तपासाला गती येत आहे. आज हालोंडीतील दोघांनी डीजे विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीसात तक्रारी दाखल केल्या… Continue reading दिड कोटींचा गंडा घालणारा ‘डिजे’ अखेर पोलीसांच्या जाळ्यात…

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन…

मुंबई (प्रतिनिधी) :  मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे आज (रविवार) वयाच्या ५८ व्या वर्षी  निधन झाले. त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. माधवी गोगटे यांनी मराठीसोबत हिंदीमध्ये देखील अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न… Continue reading मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन…

error: Content is protected !!