एसटी संपावर लवकरच…; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांबद्दल सर्वांनाच सहानुभूती आहे. त्यांचे समाधान करण्याचे सर्व प्रयत्न सरकार करत आहे. पवार साहेबांसोबत झालेल्या बैठकीत मला असं समजलं की, पवार साहेबांनी परिवहन मंत्र्यांना काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एसटी संपावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांनी आज (मंगळवार) राष्ट्रवादी… Continue reading एसटी संपावर लवकरच…; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले

पेट्रोल, डिझेलवरील वाहने बंद होणार ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यायी इंधनांनाही प्रोत्साहन देत आहे. परंतु पारंपरिक इंजिन असलेल्या वाहनांची नोंदणी थांबणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्हर्चुअली कार्यक्रमात ते बोलत होते. इलेक्ट्रिक वाहनांना सरकार प्राधान्य देत आहे. त्याचबरोबर इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापरही वाढवायचा… Continue reading पेट्रोल, डिझेलवरील वाहने बंद होणार ?

शहीद संग्राम पाटील यांच्या बलिदानाचा सन्मान हृदयात रहावा : नारायण अंकुशे

निगवे खालसा (प्रतिनिधी) : निगवे खालसा गावचा सुपुत्र शहीद जवान संग्राम पाटील यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. त्यामुळे त्यांच्या बलिदानाचा सन्मान सदैव ग्रामस्थांच्या हृदयात राहिला पाहिजे. सैनिकांच्या त्यागामुळे आज आम्ही सुरक्षित आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे यांनी केले. शहीद संग्राम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी ते बोलत होते. यावेळी… Continue reading शहीद संग्राम पाटील यांच्या बलिदानाचा सन्मान हृदयात रहावा : नारायण अंकुशे

सांगली जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा : भाजप सत्तेतून पायउतार   

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला. महाविकास आघाडीच्या पॅनेलने १८ पैकी १४ जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर आघाडीच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवल्याने भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.   सांगली कृषी उत्पन्न बाजार… Continue reading सांगली जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा : भाजप सत्तेतून पायउतार   

अनिल परब यांच्या घरावर काळी शाई फेकण्याचा प्रयत्न

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर आज (मंगळवारी) काळी शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अनिल परबांच्या घरासमोर एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर… Continue reading अनिल परब यांच्या घरावर काळी शाई फेकण्याचा प्रयत्न

क्षुल्लक कारणावरून मावशीने मुलीवर ओतले उकळलेले पाणी  

मुंबई (प्रतिनिधी) : कपडे नीट न धुतल्याच्या रागातून ९ वर्षीय मुलीवर मावशीने उकळलेले पाणी ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी   मालवणी पोलिसांनी ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे. मुलीच्या खांद्यावर, कान, मान आणि पायावर मोठ्या जखमा झाल्या असून तिला रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. आईला मानसिक आजार आहे. त्यामुळे मावशीकडे राहायला असते. कपडे… Continue reading क्षुल्लक कारणावरून मावशीने मुलीवर ओतले उकळलेले पाणी  

शशिकांत शिंदेंचा पराभव : राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दगडफेक 

सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या १ मताने पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी संतापाच्या भरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे पुन्हा एकदा साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.   यावेळी शिंदेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्यात. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित… Continue reading शशिकांत शिंदेंचा पराभव : राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दगडफेक 

रांगोळी ग्रामस्थांतर्फे आ. प्रकाश आवाडे यांचा जाहीर सत्कार

रांगोळी (प्रतिनिधी) : इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिलपदी निवड झाल्याबद्दल रांगोळी (ता. हातकणंगले)  येथील ग्रामस्थांच्या वतीने   सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इचलकरंजी येथील इंदिरा महिला सहकारी सूत गिरणीच्या व्हाईस चेअरमनपदी रांगोळीच्या माजी सरपंच संगिता सुभाष नरदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष नरदे,  रांगोळी सोसायटी चेअरमन… Continue reading रांगोळी ग्रामस्थांतर्फे आ. प्रकाश आवाडे यांचा जाहीर सत्कार

विधानपरिषदेसाठी अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपा आणि मित्र पक्षातर्फे अमल महाडिक यांनी आज (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आवाडे, प्रा. जयंत पाटील, समरजितसिंह घाटगे हे उपस्थित होते. त्याचबरोबर भाजप आणि मित्र पक्षांचे जिल्ह्यातील प्रतिनिधी, जि.प. सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते  उपस्थित होते.

…तर राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अधिकार : हायकोर्ट 

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचारी संपामुळे ग्रामीण प्रवासी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे त्वरित यावर तोडगा काढण्यात यावा, असा आदेश हायकोर्टाने आज (सोमवार) समिती आणि संघटनेला दिले. तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत न्यायालयाने खंत व्यक्त केली आहे. संपाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे.   संपकरी एसटी कर्मचारी कामावर येण्यास… Continue reading …तर राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अधिकार : हायकोर्ट 

error: Content is protected !!