सावर्डे येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली 

कळे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी आज सकाळी (शनिवारी) पन्हाळा तालुक्यातील सावर्डे येथे विद्यामंदिरमार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेतला होता. या रॅलीत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. सावर्डे येथे… Continue reading सावर्डे येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली 

दागिने चोरी प्रकरणी महिलेसह सोनारास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील उचगावमधील पेट्रोल पंपाजवळील एका घरातून २४ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला आणि हे दागिने विकत घेणाऱ्या सोनारास पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्याची किंमत सुमारे दहा लाख रुपये इतकी आहे. उचगावच्या पंपाजवळ राहणाऱ्या अश्विनी दिलीप सावंत (वय ३६) यांच्या घरातील देवघरामध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले… Continue reading दागिने चोरी प्रकरणी महिलेसह सोनारास अटक

यशिला पार्कमधील १.६५ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ

कागल (प्रतिनिधी) : यशिला पार्कचे नागरीक येत्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठबळ देतील, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमधील यशिला पार्क या उपनगरातील विकासकामांच्या प्रारंभ कार्यक्रमात आमदार मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यशिला पार्कमधील एक कोटी २० लाखांचा बागबगीचा, ३५ लाखांचे ओढ्यावरील साकव, दहा लाखांचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण, असे… Continue reading यशिला पार्कमधील १.६५ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ

राजे फाऊंडेशनमार्फत सह्याद्री रेस्क्यू फोर्सला सुरक्षा साहित्य

कागल (प्रतिनिधी) : येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनमार्फत करनूरच्या सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स टीमला सुरक्षा साहित्य प्रदान करण्यात आले. शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक यशवंत ऊर्फ बॉबी माने, युवराज पाटील, सतीश पाटील यांच्या हस्ते रेस्क्यू फोर्सचे संस्थापक विकास चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांकडे हे साहित्य प्रदान केले. गेली चार वर्षे करनूरसह परिसरात आपत्कालीन परिस्थितीमध्ये… Continue reading राजे फाऊंडेशनमार्फत सह्याद्री रेस्क्यू फोर्सला सुरक्षा साहित्य

पन्हाळा-पावनगड रस्त्यावर शाडूचा भराव कोसळला

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा-पावनगडला जोडणाऱ्या रस्त्यावर सततच्या जोरदार पावसामुळे शाडूचा भराव कोसळल्यामुळे  पावनगड-पन्हाळा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा भराव दोन अडीचच्या दरम्यान कोसळला असावा, असे फिरावयास गेलेल्या सुशांत पन्हाळकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती ‘लाईव्ह मराठी’च्या प्रतिनिधीस दिली. पावनगडावरील ग्रामस्थांना पन्हाळा, कोल्हापूर या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा एकमेव पर्यायी रस्ता आहे. भराव कोसळल्यामुळे… Continue reading पन्हाळा-पावनगड रस्त्यावर शाडूचा भराव कोसळला

कोल्हापुरात उद्या काँग्रेसतर्फे आझादी गौरव झेंडा यात्रा

कोल्हापूर : शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार, दि. १४ ऑगस्ट रोजी ‘आझादी गौरव झेंडा यात्रा’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पेटाळा मैदान येथून सकाळी ९ वाजता पदयात्रा सुरु होईल. या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील व शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसच्या झेंड्याखाली लाखो लोकांनी… Continue reading कोल्हापुरात उद्या काँग्रेसतर्फे आझादी गौरव झेंडा यात्रा

आशिया कप स्पर्धेला २७ ऑगस्टपासून प्रारंभ

दुबई (वृत्तसंस्था) : आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप यंदाच्या आशिया कप साठीचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले असून, २७ ऑगस्टपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, या क्रिकेट स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ म्हटला तर भारत हा असून, भारताने तब्बल ७ वेळा विजेतेपद मिळवल आहे. यावेळी पाच वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली भारताने… Continue reading आशिया कप स्पर्धेला २७ ऑगस्टपासून प्रारंभ

कसबा सांगावकरांना जलजीवन योजनेचे मुबलक पाणी : मुश्रीफ         

कसबा सांगाव (प्रतिनिधी) : कसबा सांगावकरांना जलजीवन योजनेतून पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार असल्याने गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत १२ कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या पाणी पूजन व ग्रामपंचायत नुतन इमारतीच्या वास्तुशांती कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजयबाबा घाटगे… Continue reading कसबा सांगावकरांना जलजीवन योजनेचे मुबलक पाणी : मुश्रीफ         

लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात आता ७५ टक्के ठिकाणी निवडणुका आहेत. तेथे महाविकास आघाडीला भाजपची ताकद दाखवू देऊ. महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र झाले तरी आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आदी निवडणुका जिंकून दाखवू. राज्यात आगामी लोकसभा निडणुकीत ४५  प्लस जागा जिंकू, अशी गर्जना नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य… Continue reading लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू : चंद्रशेखर बावनकुळे

सेंद्रिय शेती ही काळाची गरज : प्रवीण माळी

कुंभोज (प्रतिनिधी) : शेतामधील मातीचे परीक्षण करून शेती करा. शेतीला आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खताचा तसेच इतर खतांचा पुरवठा करावा. शेजाऱ्याची शेती पाहून शेती न करता स्वतःच्या बुद्धीने शेती केली तर नक्की फायदेशीर ठरेल. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, असे मत कृषी तज्ज्ञ प्रवीण माळी यांनी व्यक्त केले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत कुंभोज येथे पंचायत… Continue reading सेंद्रिय शेती ही काळाची गरज : प्रवीण माळी

error: Content is protected !!