गडहिंग्लजमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मध्यंतरीच्या काळात रविवार या बाजारादिवशी गडहिंग्लज पोलीस प्रशासनाकडून सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत एकेरी वाहतूक सुरू होती. त्या वेळी गडहिंग्लजची वाहतूक सुरळीत चालू होती. नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक देखील झाले होते. आज (रविवार) मात्र गडहिंग्लजमध्ये वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला. कोरोनाच्या काळानंतर आज प्रथमच मोठ्या प्रमाणात रविवारचा बाजार भरला होता.… Continue reading गडहिंग्लजमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

श्रीमंत सरपिराजीराव घाटगे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कागल (प्रतिनिधी) : छ. राजर्षी शाहू महाराजांचे बंधू, कागल संस्थानचे पाचवे राजे, श्रीमंत सरपिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बापूसाहेब महाराज चौकातील त्यांच्या पुतळ्यास शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कागल जहागिरीची कमान यशस्वीपणे सांभाळणाऱ्या बापूसाहेब महाराजांचा राजर्षि… Continue reading श्रीमंत सरपिराजीराव घाटगे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

देशवासीयांना इतक्या किमतीत मिळणार कोरोना प्रतिबंधक लस…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लसींना मान्यता मिळाल्याने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीच्या छायेत वर्षभर जगत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत माहिती देताना सांगितले की, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार… Continue reading देशवासीयांना इतक्या किमतीत मिळणार कोरोना प्रतिबंधक लस…

कोरोना अपडेट : चोवीस तासांत २२ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील चोवीस तासात २२ जणांना लागण झाली आहे. तर ८५० जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ७, गडहिंग्लज तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ व इतर जिल्ह्यातील ८ अशा २२ जणांना कोरोनाची लागण… Continue reading कोरोना अपडेट : चोवीस तासांत २२ जणांना लागण

नाथाजी पोवारांसारख्या नि:स्वार्थी कार्यकर्त्याची उणीव सदैव भासत राहील..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नाथाजी पोवार यांनी अभ्यासपूर्ण मांडणीमुळे हद्दवाढीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांचे अहवालानुसारच हद्दवाढ रद्द झाली. महापालिकेचा अहवाल बाजूला ठेवून त्यांच्या अहवालानुसार कार्यवाही झाली. असा नि:स्वार्थी कार्यकर्ता कोल्हापूरने गमावला आहे, अशा शब्दांत माजी आमदार संपतबापू पवार – पाटील यांनी त्यांना आदरांजली वाहिली. नाथाजीराव दुलाजीराव पोवार यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली… Continue reading नाथाजी पोवारांसारख्या नि:स्वार्थी कार्यकर्त्याची उणीव सदैव भासत राहील..!

कोरोना काळातील सत्य तपासावे : डॉ. पवन गायकवाड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात जागतिक फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. आजाराला न घाबरता सत्य काय आहे. ते बघावे आणि फसवणुकीपासून सावध राहावे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन डॉ. पवन गायकवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ येथे कृती फांऊडेशनच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत… Continue reading कोरोना काळातील सत्य तपासावे : डॉ. पवन गायकवाड

कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येते..? : ‘डीसीजीआय’चा मोठा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना लसींच्या आपात्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने संमती दिली आहे. तर या लसींवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. यावर डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना खुलासा करून या आरोपांचे खंडन केले आहे. आज (रविवार) आयोजित केलेल्या पत्रकार… Continue reading कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येते..? : ‘डीसीजीआय’चा मोठा खुलासा

बावड्यातील ‘पाठबळा’चे श्रेय कुणीही लाटू नये : सुनील जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बावड्यातील जनतेनेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विजयाची सुरवात करून दिली आहे. बावड्यातील जनतेचे क्षीरसागर यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे बावड्यातील जनतेच्या पाठबळाचे श्रेय कोणत्याही नेत्याने घेवू नये, असा पलटवार शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव यांनी केला. कसबा बावडा येथील शिवसेना विभागीय कार्यालयात आयोजित पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.  माजी आमदार… Continue reading बावड्यातील ‘पाठबळा’चे श्रेय कुणीही लाटू नये : सुनील जाधव

महापालिका निवडणूक : पक्ष विरुद्ध आघाडीतच चुरशीचा सामना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेविरोधात भाजप आणि महाडिकांची ताराराणी आघाडी असा चुरशीचा सामना होईल, असे दिसत आहे. यानुसारच प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे इच्छुकांनी तयारी सुरू… Continue reading महापालिका निवडणूक : पक्ष विरुद्ध आघाडीतच चुरशीचा सामना

‘त्यासाठी’ पंतप्रधानांच्या भेटीची वाट पाहतोय : खा. संभाजीराजे 

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरे आहे. मात्र, ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी करून पंतप्रधानांच्या भेटीची मी आज देखील वाट पाहतोय, अजून वेळ मिळाला नाही असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  निराशेचा सूर आळवला. तसेच दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर प्रकाशझोत… Continue reading ‘त्यासाठी’ पंतप्रधानांच्या भेटीची वाट पाहतोय : खा. संभाजीराजे 

error: Content is protected !!