सखी महिला मंडळातर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन  

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महिलांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत असणारे सखी महिला मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रमजानभाई अत्तार, प्रा. बाळासाहेब आजळकर यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या फोटोचे पूजन करून हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल. सामाजिक कार्यकर्ते रमजानभाई अत्तार यांचा तर शिवराज… Continue reading सखी महिला मंडळातर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन  

चंद्रकांतदादांचे पत्र म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण..! : शिवसेनेचा टोला

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळल्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरुच केली आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी… Continue reading चंद्रकांतदादांचे पत्र म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण..! : शिवसेनेचा टोला

आधी महाराष्ट्राचं नाव बदला : आमदाराचे मुख्यमंत्र्यांना आवाहन  

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. आता महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानेही काँग्रेसच्या सुरातसूर मिसळला आहे. सपाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नामांतर करण्याआधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, असे आवाहन केले आहे. अबू आझमी म्हणाले की,… Continue reading आधी महाराष्ट्राचं नाव बदला : आमदाराचे मुख्यमंत्र्यांना आवाहन  

महापालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाच वर्षात महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी आघाडी कार्यरत होती. पण यातील प्रत्येक पक्षाला आपलेच अधिक नगरसेवक निवडून यावेत्, असे वाटते. म्हणून हे तिन्ही पक्ष यावेळी स्वतंत्र लढतील. राष्ट्रवादीचाच झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून राबतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना… Continue reading महापालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा..!

कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा : मोहम्मद इम्रान प्रतापगढी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून राज्य भाजपमुक्त केले. त्याप्रमाणे आगामी निवडणुकीत कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा, असे आवाहन कवी व काँग्रेसचे युवा नेते मोहम्मद इम्रान प्रतापगढी यांनी केले. जगात नद्यांचा संगम झाला आहे. परंतु कोल्हापुरात भिन्न धर्म आणि संस्कृतीचा संगम होतो, असेही ते म्हणाले. कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या संपर्क… Continue reading कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा : मोहम्मद इम्रान प्रतापगढी

आता ६ जूनला साजरा होणार ‘शिवस्वराज दिन’ : ना. हसन मुश्रीफ   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक ६ जूनरोजी राज्यभर साजरा करण्यात येतो. परंतु यंदा हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे सकाळी ११ वाजता सर्वांनी गुढी उभारून अभिवादन करावे आणि महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रम करावा, असे… Continue reading आता ६ जूनला साजरा होणार ‘शिवस्वराज दिन’ : ना. हसन मुश्रीफ   

काँग्रेस नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन  

सातारा  (प्रतिनिधी) : काँग्रेस  पक्षाचे ज्येष्ठ नेते  व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने आज (सोमवार) पहाटे निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर आज कऱ्हाड तालुक्‍यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .  त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात आहे.   विलासकाका उंडाळकर यांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेतून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली.… Continue reading काँग्रेस नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन  

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपले सरकार, ठाकरे सरकार’ पुस्तिकेचे प्रकाशन 

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची कार्य व निर्णय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी खासदार अनिल देसाई,  खासदार धैर्यशील माने यांची विशेष उपस्थिती होती. विधान परिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून  ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. आजच्या डिजिटल युगात… Continue reading मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपले सरकार, ठाकरे सरकार’ पुस्तिकेचे प्रकाशन 

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या गावातील बिनविरोध निवडणूक चर्चेला पूर्णविराम…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांचे गाव असलेल्या यड्राव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास ५० लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. सध्या जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे. यड्रावकर गट व सतेंद्रराजे नाईक-निंबाळकर यांची युती… Continue reading आरोग्य राज्यमंत्र्यांच्या गावातील बिनविरोध निवडणूक चर्चेला पूर्णविराम…

कोल्हापुरातील शिवसेना नेत्यांनी एकसंधपणे काम करावे : मुख्यमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकमेकांना विश्वासात घेऊन एकसंधपणे काम करा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीत यश मिळवून शिवसेना बळकट करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या. कामे घेऊन या, कोणतीही कामे अडवली जाणार नाहीत अशी ग्वाही देत शिवसैनिकांना उभारी देण्यासाठी लवकरच जिल्ह्याचा दौरा करण्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. … Continue reading कोल्हापुरातील शिवसेना नेत्यांनी एकसंधपणे काम करावे : मुख्यमंत्री

error: Content is protected !!