सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन 

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  कोरोना कालावधीत जीवाची पर्वा न करता काम केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करावे, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी आज (सोमवार) वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने सीपीआर मधील अधिष्ठाता कार्यालयासमोर एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. यावेळी शासनाविरोधात जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली.  तर आठ दिवसात मागण्यांबाबत दखल न घेतल्यास १८ जानेवारी… Continue reading सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन 

लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

जालना  (प्रतिनिधी) : येत्या १६ तारखेला राज्यातील ५११ जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी सुरुवातीलाच ५० हजार ११ हेल्थ वर्कर्सना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट  ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, बर्ड फ्ल्यूचे माणसाला होण्याचे प्रमाण कमी असून पण ते झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. परिणामी यासाठी… Continue reading लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

अंडी, चिकन खाणाऱ्यांना पशूसंवर्धनमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना  महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा  शिरकाव झाल्याने राज्य सरकारने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. ‘बर्ड फ्लू’बाबत योग्य दक्षता घेण्यासाठी  राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. अंडी किंवा कोंबडीचे मांस आपण विशिष्ट तापमानावर अर्धा तासापर्यंत शिजवले, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या… Continue reading अंडी, चिकन खाणाऱ्यांना पशूसंवर्धनमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

एमपीएसीकडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. २०२० मध्ये मराठा आरक्षण आणि लॉकडाऊनमुळे ज्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या त्या नवीन वर्षात घ्यायचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवले आहे. एमपीएससीने याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२० मध्ये आयोजित परीक्षांचे सुधारित वेळापत्रक ७… Continue reading एमपीएसीकडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

…तर कृषी कायद्यांना स्थगिती देऊ : सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कृषी कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. केंद्र सरकार जर कृषी कायद्यांना स्थगिती देऊ शकत नसेल तर, आम्ही स्थगिती देऊ. त्यासाठी न्यायालय समिती नेमण्यास तयार आहे, असेही न्यायालयाने फटकारले आहे. नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत गेल्या… Continue reading …तर कृषी कायद्यांना स्थगिती देऊ : सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले (व्हिडिओ)

सांगली (प्रतिनिधी) : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीत आंदोलन सुरू केले आहे. सांगली जिल्ह्यातील या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील ऊस नोंदणी कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही शेतकरी संघटनेने याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही. सांगली जिल्ह्यातील उसाचा हंगामा… Continue reading जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले (व्हिडिओ)

नितेश राणेंना फडणवीस तुरुंगात टाकणार होते

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर आहे. दोन्ही बाजूनी सातत्याने आरोप प्रत्यारोप झडतात. आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपला… Continue reading नितेश राणेंना फडणवीस तुरुंगात टाकणार होते

…तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेत्यांनी केलेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध झाले नाहीतर ईडीच्या कार्यालयासमोर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाहीतर माझे नाव संजय राऊत नाही, असा इशारा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज (सोमवार) येथे दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर… Continue reading …तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार : संजय राऊत

वाघबीळनजीक ट्रकच्या धडकेत कसबा बावड्यातील दोन तरुण ठार

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळनजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा येथील दोन तरूण जागीच ठार झाले. रविवारी  मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन आबासाहेब रणदिवे ( वय ३०, रा.रणदिवे गल्ली (पुर्व)),  विशाल आबासाहेब हाके  (वय २९,  रा. कवलापूर जि. सांगली)  अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघातामुळे… Continue reading वाघबीळनजीक ट्रकच्या धडकेत कसबा बावड्यातील दोन तरुण ठार

जिल्ह्यात दिवसभरात  १८ जणांना डिस्जार्ज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या चोवीस तासात १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १,१६१ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोल्हापूर शहर ११ आणि इतर जिल्ह्यातील ८ असे १९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,६४३.  डिस्चार्ज –… Continue reading जिल्ह्यात दिवसभरात  १८ जणांना डिस्जार्ज…

error: Content is protected !!