सुरक्षा कपातीवर भाजपची टीका : शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन  

मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यातील ठाकरे सरकारने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक   नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार  यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन  करून आपली सुरक्षा कमी कऱण्यास… Continue reading सुरक्षा कपातीवर भाजपची टीका : शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन  

दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही : उद्धव ठाकरे

भंडारा  (प्रतिनिधी) :  भंडारा दुर्घटनेची चौकशी कऱण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.  या प्रकरणाची चौकशी करताना कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे दिला.  भंडाऱ्यातील रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या १० चिमुरड्यांच्या  कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी सांत्वन… Continue reading दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही : उद्धव ठाकरे

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जमीन जप्त

कल्याण (प्रतिनिधी) :  शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक  यांची  ईडीने चौकशी केली होती. आता याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सरनाईक  यांनी टिटवाळा गुरुवली येथील १०० कोटीची ७८ एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती सोमय्या  यांनी दिली आहे. तसेच घोटाळा केलेली १००  कोटीची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य… Continue reading शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जमीन जप्त

शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

करनाल ( वृत्तसंस्था) : हरियाणामधील करनाल जिल्ह्यातील कमला गावात भाजपच्या वतीने किसान महापंचायत रॅली बोलावण्यात आली आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार होते. पण हजारो शेतकरी त्यांचा विरोध करण्यासाठी तेथे जमले आहेत. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी प्रयत्न केले पण शेतकऱ्यांनी नकार दिला. पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे परिस्थिती… Continue reading शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

गडहिंग्लजमध्ये वाहनचालकांची जागृती मोहीम

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स तसेच वाहनांची कागदपत्रे नसताना वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणे आदींबाबत वाहनचालकांमध्ये जागृती करण्याची मोहीम गडहिंग्लजमध्ये सुरू झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या सूचनेनुसार ‘सध्या फक्त सूचना आणि नंतर कायदेशीर कारवाई’ असा पोलिसांचा अजेंडा आहे. आज (रविवार) दुपारी चंदगड मार्गावर दुचाकी वाहनधारकांना अडवून पोलिसांनी सूचना दिल्या. वाहन चालविताना… Continue reading गडहिंग्लजमध्ये वाहनचालकांची जागृती मोहीम

शिवसेनेकडून काँग्रेसला धोका : नेत्याचे सोनिया गांधींना पत्र

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू रॉय यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेविरोधात तक्रार केली असून काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.   शिवसेना नेत्यांचे घोटाळ्यांमध्ये नाव येत  आहे. त्यामुळे त्याचा धोका काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये कोणत्याही क्षणी  नवा घोटाळा बाहेर येऊ… Continue reading शिवसेनेकडून काँग्रेसला धोका : नेत्याचे सोनिया गांधींना पत्र

‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : गडहिंग्लजमध्ये एकेरी वाहतूक सुरू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लजमध्ये रविवारी बाजार भरत असतो. यावेळी वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीचा बोजवारा उडतो. याबाबत रविवारी (दि.३) ‘लाईव्ह मराठीने’ ‘गडहिंग्लजमध्ये वाहतुकीचा बोजवारा’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती.  याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एकेरी मार्ग केले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. याबद्दल नागरिक आणि वाहनधारकांतून समाधान… Continue reading ‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : गडहिंग्लजमध्ये एकेरी वाहतूक सुरू

चंद्रकांतदादांनी मानले ठाकरे सरकारचे आभार

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल पाटील यांनी समाजमाध्यमातून सरकारचे आभार मानले आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडे अशी मागणी करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा, सुव्यस्था ठिक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत… Continue reading चंद्रकांतदादांनी मानले ठाकरे सरकारचे आभार

कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या सुरक्षेत कपात

मुंबई  (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाने विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दणका बसला आहे. यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून आता फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. इतकचं नाही तर काही मंत्र्याची… Continue reading कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या सुरक्षेत कपात

स्वरा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महास्वछता अभियानांतर्गत स्वरा फाउंडेशनच्या वतीने जयंती पम्पिंग स्टेशन येथे स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या  ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आर.के. पाटील, स्वरा फाउंडेशनच्या संचालक प्राजक्ता माजगावकर, महिला जिल्हाध्यक्ष सविता पाडळकर, उपाध्यक्ष आदित्य पाटील, पियुष हुलस्वार, फैजान देसाई, मुकुंद कांबळे, सुफियान शेख, मानसी… Continue reading स्वरा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण  

error: Content is protected !!