ऐनापूरला ‘मॉडेल’ गाव बनवणे हेच गावविकास महाआघाडीचं ध्येय ! : टी. एस. देसाई (व्हिडिओ)

ना. हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून देऊन ऐनापूरला ‘मॉडेल’ गाव बनवणे हेच गावविकास महाआघाडीचं ध्येय असल्याचे टी. एस. देसाई यांनी स्पष्ट केलं.  

दऱ्याचे वडगाव येथे जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊंना अभिवादन…

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथे आज (मंगळवार) राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ ई-सेवा केंद्रामार्फत, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच गावातील पहिली ते दहावीच्या सर्व मुलींना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. तर साखर, पेढे गावामध्ये वाटत राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर… Continue reading दऱ्याचे वडगाव येथे जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊंना अभिवादन…

इचलकरंजी येथे केडीसीसीच्या ‘ई’ लॉबी इमारतीचे भूमिपूजन…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील केडीसीसी बँकेच्या मुख्य शाखेच्या ई लॉबीच्या इमारतीचे भूमिपूजन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक आणि आ. राजूबाबा आवळे उपस्थित होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने ई लॉबी प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बँकेचे संचालक… Continue reading इचलकरंजी येथे केडीसीसीच्या ‘ई’ लॉबी इमारतीचे भूमिपूजन…

राजमाता जिजाऊंचा आदर्श भावी पिढीने घ्यावा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजमाता जिजाऊ या छ. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार बघत न्यायनिवाडा करीत होत्या. तो काळ विचारात घेतला तर प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजल्याच्या पालनकर्त्या होत्या. अशा या राजामातेचा आदर्श भावी पिढीनेही घ्यावा. असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. छ. शिवाजी महाराजांना त्यांच्या बालपणातच स्वराज्याचे धडे शिकविणाऱ्या रणरागिणी… Continue reading राजमाता जिजाऊंचा आदर्श भावी पिढीने घ्यावा : राजेश क्षीरसागर

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी केली अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या शाहूपुरी पोलिसांनी मार्केट यार्डाजवळ अटक केली. अनिल बाबूराव तावडे (वय ४०, रा. सरवडे, ता. राधानगरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत राऊंड जप्त केला आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती… Continue reading गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी केली अटक

पडखंबे प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील पडखंबे येथे जलसंधारण महामंडळाकडून ल.पा.प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतू प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यशासनाकडून खासबाब म्हणून ७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती आ. प्रकाश आबिटकर यांनी दिली. पडखंबे ल.पा.तलाव हा गेल्या १० ते १५ वर्षापासून निधी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत होण्याच्या प्रश्नामुळे प्रलंबित… Continue reading पडखंबे प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

कॉ. दत्ता मोरे यांची वाटचाल पुढील पिढीसाठी मार्गदर्शक : राहूल देसाई

गारगोटी (प्रतिनिधी) : शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, डंगे धनगर, असंघटीत कामगार यांच्यासाठी कॉ. दत्ता मोरेंची वाटचाल पुढील पिढीसाठी निश्चित मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन युवक नेते राहुल देसाई यांनी केले. ते स्वातंत्र्य सेनानी कॉ. दत्ता मोरे यांच्या ९३ व्या जयंती निमित्त गारगोटीमध्ये ग्रा.पं. कर्मचारी सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, कॉ.… Continue reading कॉ. दत्ता मोरे यांची वाटचाल पुढील पिढीसाठी मार्गदर्शक : राहूल देसाई

जिल्ह्यात चोवीस तासात २५ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ६९१ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहर १६, आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३,राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात २५ जणांना कोरोनाची लागण…

करोडोंचा गंडा घालणाऱ्या व्हिजन अॅग्रोच्या तुकाराम पाटील याला अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ज्यादा परताव्याच्या अमिष  दाखवून हजारो ठेवीदारांची  करोडो रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या व्हिजन अॅग्रो कंपनीचा संचालक डॉ. तुकाराम शंकर पाटील (वय ४०, रा. माजगाव, ता. पन्हाळा) याला गुन्हे अन्वेषण शाखेने काल (सोमवार) रात्री उशिरा अटक केली. त्याला आज (मंगळवार) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून… Continue reading करोडोंचा गंडा घालणाऱ्या व्हिजन अॅग्रोच्या तुकाराम पाटील याला अटक…

राशिवडे, चांदे रस्त्यावरील मृत कोंबड्यांच्या वृत्ताबाबत पशुसंवर्धन उपआयुक्तांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राशिवडे व चांदे रस्त्यावर १०० हून अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकल्याबाबत वृत्त चुकीचे असून ती अफवा असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. पठाण यांनी आज (मंगळवार) पत्रकाद्वारे स्पष्ट केले. प्राण्यांच्या रोगासंदर्भात वृत्तांकन करताना पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून शहानिशा करावी, असे शब्दांत पठाण यांनी संबंधितांना कानपिचक्या दिल्या आहेत. पत्रकात म्हटले… Continue reading राशिवडे, चांदे रस्त्यावरील मृत कोंबड्यांच्या वृत्ताबाबत पशुसंवर्धन उपआयुक्तांचे स्पष्टीकरण

error: Content is protected !!