कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि पन्हाळाकरिता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने, अशासकीय अधीक्षकाचे प्रत्येकी एक पद भरण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक १० नोव्हेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे.

हे अशासकीय पद फक्त सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या ज्युनियर कमिशन ऑफीसरसाठी आहे. त्यासाठी त्यांचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे, जेसीओ रॅंकमध्ये कमीत, कमी ५ वर्षे सेवा केलेली असावी. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

दरम्यान, सैनिकी मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पहारेकऱ्याचे एक पद भरण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक दहा नोव्हेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत. हे पद कंत्राटी पध्दतीचे व एकत्रित मानधनावर आहे. माजी सैनिकास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे ०२३१ – २६६५८१२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.