मुंबई : देशात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली. देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. तर राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांचा तिढा कायम आहे. तर काही ठिकाणी पक्षाने उमेदवारी न दिल्याने नेते बंडाचे निशाण हाती घेत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होत असताना डॉ. अनिकेत देशमुख यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला होता. पण रात्रीत शरद पवार यांनी सूत्रे फिरवत डॉ. अनिकेत देशमुखांचे बंड थंड करत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहण्याची घोषणा देशमुख यांनी केली आहे.

डॉ. अनिकेत देशमुख यांनी माढा मधून निवडणूक लढण्याचा निरयन घेतल्यानंतर शरद पवार यांनी तातडीने डॉ. देशमुख यांना तातडीने बारामती येथे बोलावून घेतले होते . रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी समजूत घातल्यावर अनिकेत यांचे बंड थंड झाले आहे . डॉ. अनिकेत देशमुख यांनी माघार घेत महविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहण्याची घोषणा केली आहे. रात्रीत शरद पवार यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड थंड केले आता उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शरद पवार यांनी डॉ. देशमुख यांची भूमिका समजावून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले . यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील उपस्थित होते. यानंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपल्या मनातील सामाजिक आणि राजकीय अडचणी पवार यांना सांगितल्या आहेत. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनीही सांगोल्यासाठी पुढील पाच वर्षात काय करणार आणि काय करायला पाहिजे याबाबत डॉ. देशमुख यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत समाधान झाल्याने आज सकाळी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसून आता महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचे डॉ. अनिकेत देशमुख म्हणले.

अनिकेत देशमुखांना मिळणार होती संधी
माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, महादेव जानकर यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याच्या अगोदर डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. जेव्हा उमेदवार नव्हता तेव्हा शरद पवार यांनी आमच्या नावावर चर्चा सुरू केली होती. पण निष्ठावंत उमेदवार असताना भाजपकडून उमेदवार आयात केला आणि आमची फसवणूक केली, असं अनिकेत देशमुख म्हणाले होते.