कोल्हापूर (प्रतिनिधी) : विकलेल्या पाळीव श्वानाचे पैसे मागितल्याच्या रागातून एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. अशोक रामचंद्र मदार (वय 60, रा. कनाननगर) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मदार यांनी आडग्या मोरे,  त्याची पत्नी गुड्डी मोरे, त्याचा साथीदार अशा तिघांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, कनाननगर येथील अशोक मदार यांच्याकडून आडग्या मोरे याने पाळीव श्वान विकत घेतला होता. मात्र, त्याचे पैसे मदार यांना दिले नव्हते. काल (बुधवार) रात्री मदार यांनी आडग्या मोरे याच्याकडे विकलेल्या श्वानाच्या पैशांची मागणी केली. त्या रागातून आडग्या मोरेसह तिघांनी अशोक मदार यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात मदार गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

याप्रकरणी अशोक मदार यांनी आडग्या मोरे,त्याची पत्नी गुड्डी मोरे आणि त्यांचा एक साथीदार (तिघेही रा. कनाननगर) या तिघांच्या विरोधात आज शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.