गारगोटी (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास भुदरगड तालुका शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस. माने यांनी व्यक्त केला. ‘कोजिमाशि’ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचा भुदरगड तालुका प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सोहळ्यात प्राचार्य माने बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कोजिमाशि’चे संचालक एस. एम.पाटील होते.

एस. एम.पाटील यांनी आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी लोकशाही विकास आघाडी रिंगणात उतरली असून, या आघाडीस जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. ग्रंथपाल मारुती भराडे यांनी मौनी विद्यापीठातील ८० टक्के मतदान राजर्षी शाहू आघाडीस मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर म्हणाले, सभासदभिमुख कारभाराला सोयीस्करपणे विसरून सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभाराचा कळसच केला आहे. याला सभासद निश्चितच जागा दाखवतील. तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष वजीर मकानदार यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पाढा वाचून, परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. के. ए. देसाई, सदाशिव करडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संतोष भोसले, बी. ए. सदलगे, के. टी. कांबळे, व्ही. जे. कदम, एस. एम. खेगडे, के. एस. गोजारे, सी. बी. माने, डॉ. एस. बी. शिंदे, प्रा. डी. एस. देसाई, पी. डी. पाटील, प्रा. विलास देसाई, सुनील राजगिरे, हेमंत देसाई, प्रकाश भांदिगरे, सचिन डेळेकर, आर. डी. देसाई, अजित तोरस्कर, यु. एस. मुळीक, एस. एस. कासार, अशोक वारके, युवराज नाईक, डी. वाय. पाटील, विजय आदित्य, आक्काताई नलवडे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.