पुणे (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी रविवारी कोरोनाची चाचणी केली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

माझी प्रकृती चांगली असून, मी डॉक्टरांचा सल्ला घेतला असल्याची माहिती त्यांनी स्वत:हून दिली आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना देखील यावेळी अजित पवार यांनी दिल्या आहेत.