कुरुंदवाड (प्रतिनिधी) : पानपट्टीचे दुकान बंद करणारी तू कोण, असा जाब विचारत महीलेच्या अंगावर धावून जावून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी सतिश परशुराम वडर (रा. दत्तवाड, ता. शिरोळ) याच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत महीलेने याबाबतची फिर्याद दिली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली.


पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरासमोर पानपट्टीचे दुकान असल्याने ‍पानटट्टीजवळ लोक दंगा करत अश्लील बोलत असतात. त्यामुळे महीलेची तक्रार होती. या पानपट्टीजवळ संशयित आरोपी सतिश वडर खुर्चीवर बसून फिर्यादी आणि तिच्या सुनेकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.