कळे (प्रतिनिधी) : माध्यमिक मुख्याध्यापक संघ कोल्हापूरमार्फत घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेमध्ये कळे येथील कन्या विद्यामंदिरमधील इयत्ता पाचवीच्या मुलींनी देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

कळे केंद्रावर झालेल्या या परीक्षेमध्ये शर्वरी विनायक शिंदे ही ८१ टक्के गुण मिळवून प्रथम आलेली आहे. सई विनायक हजारे हिने ८० टक्के गुण मिळवून दुसरा, निकिता शिवाजी देसाई हिने ७७ टक्के गुण मिळवून तिसरा, शर्वरी संदीप सुतार हिने ७५ टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक मिळवला आहे.

स्मिता जीवन मिठारी (७० टक्के), दिया देवदास पवार (६५ टक्के), श्रेया शेखर माळवे (६४ टक्के), प्रतीक्षा उदयसिंग कांबळे (५० टक्के) या मुली गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाल्या आहेत. त्यांना वर्गशिक्षिका किशोरी महादेव चौगुले, मुख्याध्यापक बजरंग बुवा, केंद्रप्रमुख विजय फासे यांचे मार्गदर्शन लाभले.