मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. सीबीआयने त्यांच्या जामिनावरील स्थगिती वाढवून मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. सीबीआयची ही विनंती मान्य केल्याने देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

अनिल देशमुख यांना गेल्या १२ तारखेला त्यांना जमीन मंजूर करण्यात आला होता; पण सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांचा जामीन अर्जाला मुंबई न्यायालयाने १० दिवस स्थगिती दिली होती. आज त्यावर सुनावणी झाली.

देशमुख यांच्या जामिनावरुन स्थगिती दि. ३ जानेवारीपर्यंत ठेवावी, असे सीबीआयने कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले होते, यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने देशमुख यांच्या जामिनावर स्थगिती २७ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. देशमुख यांना १०० कोटी रुपये वसुलीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांना अद्याप ही जामीन मिळालेला नाही. अनिल देशमुख यांना ईडीने २९ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. या प्रकरणात सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार झाला आहे.