दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या डी कंपनीकडून फूस मिळत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आणि साधनसामुग्री पुरवली जात आहे, असा दावा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) केला आहे.
दाऊद आणि त्याचा साथीदार छोटा शकील पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ले  करण्यःच्या प्रयत्नात असल्याचे एनआयएने म्हटले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, दाऊदने पाकिस्तानातून २५ लाख रुपये दुबईत हवालाद्वारे सुरत आणि त्यानंतर मुंबईला पाठवले आहेत. हे रुपये आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना पाठवण्यात आले आहेत. अशाप्रकारे दोघांनी गेल्या चार वर्षांत १२-१३ कोटी रुपये पाठवले आहेत.
साक्षीदार हा सुरतस्थित हवाला ऑपरेटर असून, त्याची ओळख सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान असे समोर आले आहे की, रशीद मारफानी ऊर्फ ​​रशीद भाई हा हवाला मनी ट्रान्सफरचे काम स्वीकारत होता. जेणेकरून वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे पैसे दुबईत भारतात पाठवायचे.
दाऊद टोळीकडून भारतातील राजकीय नेते, मोठे व्यापारी, उद्योजक, प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यक्ती यांच्यावर हल्ले करण्यासाठी, तसेच सर्वसामान्य जनतेत घबराट निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यासाठी विशेष गट तयार करण्यात आला आहे.