कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये अतिवष्टी व महापुरामुळे उद्भवलेल्या संकटकाळात जीवितहानी व आर्थिक हानी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामधील गाव व तालुकास्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजना या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी चार दिवसांमध्ये आढावा घेण्यासाठी दौऱ्याचे नियोजन केलेले आहे.

हे करत असताना येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व जिल्ह्याचा दौरा एकाच वेळी करणे अशक्य असल्याने कोल्हापूर जिल्हांतर्गत १२ तालुक्याकरिता संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेकडील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे संपर्क अधिकारी हे दि.१३, १४ व १५ जुलै अखेर त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यांना भेटी देऊन अतिवृष्टीमध्ये उदभवणाऱ्या महापुराच्या अनुषंगाने सर्व उपाय व नियोजन करणार आहेत.