कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीने झालेले नुकसान व समाजातील सर्वच स्तरावर झालेला त्याचा आर्थिक परिणाम तसेच नवीन येवू घातलेली कोरोनाची साथ, या पार्श्वभूमीवर करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांनी आपला आज (बुधवार) होणार वाढदिवस अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला.
राजारामपुरीत त्यांच्या निवासस्थानी गोकुळ परिवारातर्फे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गोकुळचे संचालक बाळासो खाडे, शिवाजी कवठेकर, भारत पाटील-भुयेकर, विश्वजीत पाटील सडोलीकर, सचिन पाटील, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी पी.आर. पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवशी राजकीय, सामाजिक विविध स्तरातील लोकांचा त्यांच्या बंगल्यावर दिवसभर राबता असायचा. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस अंत्यत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे.