कोल्हापूर (प्रतिनिधी) : रेसकोर्स नाक्याजवळील सांस्कृतिक मंडळांमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. जुगार अड्डाचा मालक आणि जुगार खेळणाऱ्या १५ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि मोटरसायकल असा दोन लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेसकोर्स नाक्याजवळील साई सम्राट कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या खोलीमध्ये तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज (सोमवार) सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला. येथील जुगार अड्ड्याचा मालक सुहास काशिनाथ पोवार (वय ४८ रा. शिवाजी पेठ) याच्यासह जुगार खेळणारे बाळासो दत्तात्रय कानकेकर (वय ५१, रा. जरगनगर रोड), जयराम कृष्णात पीगळे (वय ३८, रा. रामानंदनगर), नितीन लक्ष्मण वाडेकर (वय ४५, रा. जरगनगर), किशोर पांडुरंग शिंदे (वय ५३, रा. पोवार कॉलनी पाचगाव), विकी मनोज धारू (वय ३०, रा. शाहू कॉलनी), राहुल आनंदराव देसाई (वय २८, रा. वारे वसाहत), निलेश नितीन महिंद्रकर (वय ३२, रा. मंगळवार पेठ), रामू मारुती कुऱ्हाडे (वय ६० रा. सुधाकर जोशी नगर), देवेंद्र शिवाप्पा जावळे (वय ५५, रा. सुधाकर जोशी नगर), योगेश तानाजी निर्मळ (वय २८ रा. कंदलगाव, ता. करवीर), अक्षय सुनील चौधरी (वय २४, रा. कामगार चाळ), प्रवीण हिंदुराव साबळे (वय २७, रा. निर्माण चौक), अण्णा सुरेश चांदणे (वय ५४, रा. वारे वसाहत) आणि संतोष दिनकर माळी (वय ३७, रा. मंगळवार पेठ), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  या जुगार अड्ड्याचा मुख्य मालक नितीन गोधडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.