टोप येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात ९ कोकरांचा मृत्यू…

टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात ९ कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यामुळे मेंढपाळांचे सुमारे पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाले आहे. गावाच्या पूर्वेस वेताळमाळ नजीक असलेल्या शेतात सोमा अन्नाप्पा सिसाळ व सहकाऱ्यांच्या  बकऱ्यांचा तळ बसला आहे. नेहमीप्रमाणे मेंढपाळ लहान पिल्ले डालग्यात (जाळी) ठेवून मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी… Continue reading टोप येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात ९ कोकरांचा मृत्यू…

यड्राव येथे किराणा व्यापाऱ्याचा खून : संशयितास अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता. शिरोळ) येथे अनैतिक संबंधातून एका तरुण व्यापाऱ्याचा खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा.बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव असून आरोपी अजित उर्फ पिंटू आदमाने (वय ४०, रा. बेघर वसाहत, यड्राव) याने स्वतः शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला… Continue reading यड्राव येथे किराणा व्यापाऱ्याचा खून : संशयितास अटक

जिल्ह्यात १,८५५ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. मागील चोवीस तासांत एकूण १,८५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) १,३६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तब्बल ९,३२९ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ५४६, आजरा ७३, भुदरगड ३८,… Continue reading जिल्ह्यात १,८५५ जणांना कोरोनाची लागण…

आर.के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण…

पाचगांव (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे लसीकरण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून हे लसीकरण झाले. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या काळात ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्रशासनानेही महत्त्व दिले… Continue reading आर.के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण…

जिल्हा परिषदेकडून छ. शाहू पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची नावे जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात राबविण्यात विकासकामांमध्ये येणाऱ्या विविध जि. प. व व पंचायत समिती सदस्य, जि.प. कर्मचारी यांचे यांचाही सहभाग मोठा असतो. जि.प. व पं.स.सदस्य व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा व पुढील काम करणेस प्रोत्साहन मिळावे या करिता जिल्हा परिषदेकडून २०२०-२१ चा जिल्हा परिषद कर्मचारी (वर्ग ३) मधील (ग्रामसेवक व शिक्षक सोडून)… Continue reading जिल्हा परिषदेकडून छ. शाहू पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची नावे जाहीर…

इचलकरंजीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीची कार्यवाही थांबवा : नगराध्यक्ष

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी हाती घेण्यात आलेल्या मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्याचे आदेश नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी यांनी दिले आहेत. कोरोना महामारीमुळे नगरपरिषदेच्यावतीने चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे काम स्थगित ठेवण्यात आले होते. त्यामुळे सन २०२१-२२ ते २०२४-२५ सालासाठीच्या कर आकारणीसाठी मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेऊन त्यासाठी कर्मचार्‍यांची… Continue reading इचलकरंजीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीची कार्यवाही थांबवा : नगराध्यक्ष

‘त्या’मुळेच जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाहीच..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील आठवड्यापासून म्हणजे ५ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा सध्या ४ थ्या गटात आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी असली तरी पॉझिटिव्हिटी रेटमध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचल्याने पुढील… Continue reading ‘त्या’मुळेच जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाहीच..?

जिल्हा परिषदेला ‘मोबाईल मेडिकल युनिट’ सेवा प्राप्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कोल्हापूर जिल्हायातील आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांमध्ये आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने फिरते वैदयकीय पथक मोबाईल मेडिकल युनिट सेवा  प्राप्त झाली आहे. जिल्ह्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली मोबाईल मेडिकल युनिट  बस उपलब्ध झाली आहे. याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आरोग्य सेवेची आवश्यकता, साथरोग रुग्णांची… Continue reading जिल्हा परिषदेला ‘मोबाईल मेडिकल युनिट’ सेवा प्राप्त…

उंचगाव, वळीवडे ओढ्यावरील अतिक्रमणे काढा, अन्यथा… : दलित महासंघाचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उंचगाव,  वळीवडे हद्दीतून जाणाऱ्या ओढ्यावरील अतिक्रमणे येत्या दहा दिवसात जमीनदोस्त करावीत. अन्यथा दलित महासंघाचे कार्यकर्ते पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी घेतील, असा इशारा दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिला. उंचगाव, गडमुडशिंगी, वळीवडे आणिव गांधीनगर येथील सांडपाणी निचरा होण्यासाठी मोठा ओढा वाहत होता. पण त्यावर… Continue reading उंचगाव, वळीवडे ओढ्यावरील अतिक्रमणे काढा, अन्यथा… : दलित महासंघाचा इशारा

आषाढीवारीचा तिढा सुटला : उपमुख्यमंत्र्यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा…

पुणे (प्रतिनिधी) : यंदाच्या आषाढी वारीवरून सरकार आणि वारकरी संप्रदाय यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू आणि आळंदीत प्रस्थानासाठी १०० वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी ५० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर… Continue reading आषाढीवारीचा तिढा सुटला : उपमुख्यमंत्र्यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा…

error: Content is protected !!