कोल्हापुरात २२ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान आणि थोर नेते यशवंतराव चव्हाण यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू सभागृहासमोर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण त्यांचे शिष्य आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती जि. प. चे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील… Continue reading कोल्हापुरात २२ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते अनावरण

फुलेवाडी रिंगरोड येथे विवाहितेची आत्महत्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी रिंगरोड येथील चंद्राई कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती मिलिंद सरूडकर (वय ३२. रा. चंद्राई कॉलनी, फुलेवाडी, रिंग रोड) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  फुलेवाडी रिंगरोड येथील चंद्राई कॉलनीमध्ये ज्योती सरूडकर… Continue reading फुलेवाडी रिंगरोड येथे विवाहितेची आत्महत्या…

राशिवडेतील रिंगरोड होणार कधी ? : ग्रामस्थांचा संतप्त सवाल

राशिवडे (प्रतिनिधी) :  राशिवडे येथील रिंगरोड होणार कधी ? हा प्रश्न दरवर्षी उसाच्या सीझनमध्ये ठरलेला आहे. उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना अपघात होतो, मग एखादी बातमी येते. आज (शुक्रवार) याच रस्त्यावर एका उसाने भरलेल्या ट्रॉलीला अपघात झाला. परंतु, प्रशासन काही केल्या जागे होत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग एवढा सुस्त झाला आहे का ? असा संतप्त… Continue reading राशिवडेतील रिंगरोड होणार कधी ? : ग्रामस्थांचा संतप्त सवाल

गुड न्यूज : ‘सीरम’च्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता ; लवकरच लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात येणाऱ्या ‘कोविशिल्ड‘ या कोरोना प्रतिबंधक लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. आज (शुक्रवार) भारताचे औषध महानियंत्रक कार्यालयातील अधिकारी आणि कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. भारतात लसीला परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाला लवकरच सुरुवात होईल. भारतीय औषध महानियंत्रक कार्यालय आणि केंद्र सरकारच्या तज्ज्ञगटाची आज… Continue reading गुड न्यूज : ‘सीरम’च्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता ; लवकरच लसीकरण

कोल्हापुरी ठसका : महापौरपदानंतर फुलस्टॉप…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमदार, खासदार, मंत्री होण्याची संधी मिळत असते. तो एक उत्तम मार्ग आहे. कोल्हापूर शहर मात्र त्याला आजपर्यंत अपवाद ठरले आहे. महापौर पदानंतर प्रयत्न करूनही तशी संधी कुणालाच मिळाली नाही. सर्वांनाच महापौर पदानंतर फुलस्टॉप घ्यावा लागला हा इतिहास आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करण्यासाठी राजकारणाचा अनुभव असावा लागतो. असा अनुभव किंवा राजकारणाचे बाळकडू… Continue reading कोल्हापुरी ठसका : महापौरपदानंतर फुलस्टॉप…

‘फास्टॅग’वरून किणी टोल नाक्यावर गोंधळ : वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)

किणी टोल नाक्यावर ‘फास्टॅग’ लेनमधून येणाऱ्या वाहनांना चक्क दुप्पट चार्ज आकारण्यात आल्याने वाहनधारकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.  

श्री अंबाबाई मंदिराचा महाद्वार दरवाजा खुला : भाविकांत समाधान (व्हिडिओ)

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्री अंबाबाई मंदिराचा महाद्वार म्हणजे पश्चिम दरवाजा आज उघडण्यात आला आहे. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.  

भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. त्यांच्याहस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. हा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता.… Continue reading भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

शहरांची नावे बदलून काय होणार..? : थोरातांचा भाजपवर निशाणा

अहमदनगर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करत नाही. निवडणुकांच्या तोंडावर भावनिक मुद्दा पुढे केले जातात. आणि भाजपकडून समाजात तेढ निर्माण करणारे विषय पुढे आणले जातात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (शुक्रवार) येथे केली आहे. संगमनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. थोरात म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचे… Continue reading शहरांची नावे बदलून काय होणार..? : थोरातांचा भाजपवर निशाणा

गडहिंग्लज सायकल क्लब, नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत हरित  संकल्पासाठी गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आज (शुक्रवार) आयोजन केले होते. या रॅलीची सुरुवात गडहिंग्लज नगरपरिषदेच्या प्रांगणातून करण्यात आली. या सायकल रँलीचा शुभारंभ गडहिंग्लज नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केला. यामध्ये गडहिंग्लज नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, गडहिंग्लज… Continue reading गडहिंग्लज सायकल क्लब, नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली…

error: Content is protected !!