पुणे ‘पदवीधर’, ‘शिक्षक’साठी पन्हाळा तालुक्यात उच्चांकी मतदान…

पन्हाळा (प्रतिनिधी) :  पुणे पदवीधर मतदारसंघातील पन्हाळा तालुक्यात पदवीधर ६८ टक्के तर शिक्षकांचे ८५ टक्के मतदान झाल्याची माहीती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली. हे मतदान तालुक्यातील १२ केंद्रावर शांततेत पार पडले.   पदवीधरांचे मतदान ४ हजार ९५६ होते. या निवडणूका कोरोना काळात होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला होता. तसेच… Continue reading पुणे ‘पदवीधर’, ‘शिक्षक’साठी पन्हाळा तालुक्यात उच्चांकी मतदान…

शिक्षक, युवावर्ग महाविकास आघाडीबरोबरच ! : आ. ऋतुराज पाटील

मागील काही वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघातील युवकांचे आणि शिक्षकांचे प्रश्न सुटले नसल्याने हे दोन्ही वर्ग आघाडीबरोबरच राहिले आहेत, असा विश्वास आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.  

‘कोणी कितीही लॉबिंग करू दे, कोरोना लस कोणाला पहिल्यांदा द्यायची ते ठरलंंय…’

मुंबई (प्रतिनिधी) : पुढील काही महिन्यांत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. या लसीसाठी कोणी कितीही लॉबिंग करावे, राज्य सरकारने मात्र कोणाला लस प्रथम द्यायची ते ठरवले आहे. सर्वप्रथम आम्ही पोलीस आणि डॉक्टरांना लस देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (मंगळवार) जाहीर केले. अनेक कंपन्या कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारतात ही लस… Continue reading ‘कोणी कितीही लॉबिंग करू दे, कोरोना लस कोणाला पहिल्यांदा द्यायची ते ठरलंंय…’

शिवसैनिक म्हणून काम करणार : उर्मिला मातोंडकर

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मी शिवसैनिक म्हणून आली आहे. शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. काम करण्याची इच्छा असल्याने कोणत्याही अपेक्षाविना शिवसेनेत प्रवेश केला आहे’, अशी माहिती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दिली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर… Continue reading शिवसैनिक म्हणून काम करणार : उर्मिला मातोंडकर

महाराष्ट्रात ३ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन..

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील सहा दिवसांपासून निदर्शन करीत आहेत. कृषी कायदा रद्द करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतमालाला हमीभाव द्या, अशा घोषणा शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांचे हे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही घेतला आहे. महाराष्ट्रातही ३ डिसेंबर रोजी उग्र आंदोलन… Continue reading महाराष्ट्रात ३ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन..

निशांत गोंधळी ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रांतिसूर्य फाऊंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून पुरस्कार प्रदान केला जातो. २०२० मधील क्रांतिसूर्य फाऊंडेशनतर्फे निशांत राजेंद्रकुमार गोंधळी (रा. पाचगांव) यांना ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान पुरस्कार २०२०’ प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी तसेच सुप्रसिध्द अभिनेता स्वप्नील राजशेखर यांच्या… Continue reading निशांत गोंधळी ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य युवासन्मान’ पुरस्काराने सन्मानित

‘पुणे पदवीधर, शिक्षक’ मतदारसंघासाठी दिग्गजांनी केले मतदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांवर आज (मंगळवार) सकाळपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. जिल्ह्यातील दिग्गज नेते, शासकीय अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपा प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूल येथील केंद्रावर मतदान केले. कागल येथील सर पिराजीराव विद्यामंदिर केंद्रात ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी… Continue reading ‘पुणे पदवीधर, शिक्षक’ मतदारसंघासाठी दिग्गजांनी केले मतदान…

महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीच्या समन्वयकपदी रजनीकांत खांडेकर

सावरवाडी (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीअंतर्गत राज्यस्तरीय समन्वयकपदी करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील रजनीकांत शशिकांत खांडेकर यांची निवड करण्यात आली. विधानसभा मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री रामभाऊ गुंडीले  यांच्याहस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चंदन भुतार जोगे, राजू पटेल, वर्षा भुताळे मनोज गोइल आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापुरात आंदोलनावेळी पोलिसांकडून राजू शेट्टींना धक्काबुक्की… (व्हिडिओ)

कृषी कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापुरात आंदोलन केले. यावेळी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांचेसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्क्की केल्याने तणाव निर्माण झाला.  

कसबा बीड येथील प्राचीन महादेव मंदिरात दीपोत्सव…

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या महादेव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. बाराव्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिराची ख्याती पंचक्रोशीत आहे. गावातील युवकांच्या प्रयत्नातून मंदिर परिसरात पंधराशे दिव्यांची आरास करण्यात आली होती. मंदिर परिसर दिव्यांमुळे प्रकाशमय झाला होता. रांगोळीच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना मानवंदना… Continue reading कसबा बीड येथील प्राचीन महादेव मंदिरात दीपोत्सव…

error: Content is protected !!